Monday, December 14, 2020

*कुपोषण निर्मूलनासाठी मु.का.अ.यांची कुपोषण मुक्त बीट संकल्पना*

*कुपोषण निर्मूलनासाठी मु.का.अ.यांची कुपोषण मुक्त बीट संकल्पना* 
 पालघर (प्रतिनिधी)पालघर जिल्हा मधून कुपोषणाची समस्या नष्ट करून त्याचा समूळ नायनाट करण्यासाठी टप्प्याटप्प्याने उपाययोजना करणे महत्त्वाचे असल्याने "कुपोषण मुक्त जिल्हा" अशी संकल्पना डोळ्यासमोर ठेवून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी व कार्यरत पर्यवेक्षिका यांच्या कामाचा आढावा घेऊन त्यांना योग्य त्या मार्गदर्शक सूचना केल्या.

 पालघर जिल्ह्यामध्ये सर्व तालुका मिळून तेरा प्रकल्प असून १०३ बीट आहेत. प्रत्येक बीट निहाय सरासरी २५ अंगणवाडी केंद्र कार्यरत असून एकूण ३१८३ अंगणवाडी केंद्रे आहेत. एकात्मिक बालविकास प्रकल्प पालघर मध्ये सॅम व मॅम मुक्त बीटची संख्या ३, मनोर -४, डहाणू-१ वसई १  असे एकूण १ बीट आहेत. परंतु सॅम नसणारी  व मॅम श्रेणी मध्ये असणारी बीटची संख्या ३४ इतकी आहे. ५ बालके सॅम श्रेणी मध्ये असणारी बीट ४४ इतकी आहेत .
जिल्हा कुपोषणमुक्त करायचा  असल्यास सॅम मॅम मुक्त अंगणवाडी केंद्र व सॅम मॅम मुक्त अंगणवाडी प्रभाग राबवण्याचा  जिल्हा परिषदेचा मानस आहे.
 आयसीडीएस व आरोग्य विभागातील कर्मचारी यांनी एकत्रितरीत्या समुपदेशन व बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वयंप्रेरणेने कामकाज केल्यास कुपोषण मुक्त होण्यास वेळ लागणार नाही, तसेच त्यामध्ये सातत्य टिकून ठेवावे लागेल. यासाठी दर तीन महिन्यांनी सातत्य टिकवून ठेवणाऱ्या पर्यवेक्षिका व अंगणवाडी कार्यकर्ती यांना जिल्हा परिषदे मार्फत प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. तसेच  नोव्हेंबर डिसेंबर महिन्यापासून काम करता करता जिल्ह्यातील अनेक कुटुंबे स्थलांतरित होत होत असताना ज्या ठिकाणी स्थलांतरित होतील त्या जवळच्या अंगणवाडी मध्ये बालकांना सुविधा उपलब्ध करून देऊन आरोग्य शिबिरे लावण्याबाबत मु.का.अ. यांनी सूचना दिल्या. 
 'माझी कन्या भाग्यश्री' योजनेअंतर्गत ज्या पालकांनी एक वा दोन मुलींवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असल्यास त्यांना अनुक्रमे रु. पन्नास हजार व रु. पंचवीस हजार देण्यात यावे. अंगणवाडी निहाय पिण्याचे पाणी उपलब्ध करण्याकरता जल जीवन मिशन अंतर्गत सर्वांनी प्रयत्न करावे अशा सूचना यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या.
बाल संगोपन योजनेबाबत जास्तीत जास्त प्रस्ताव जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे सादर केल्यास एक  पालक असणार्‍या किंवा पालक नसणाऱ्या बालकांना त्याचा फायदा घेता येईल असेही मत त्यांनी व्यक्त केले .
विविध विभागांशी समन्वय साधून कुपोषण मुक्तीसाठी मु.का.अ. यांचे प्रयत्न सुरू आहेत.
या बैठकी वेळी प्रवीण भावसार जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद पालघर हे उपस्थित होते.

राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा श्री शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर संपन्न

राष्ट्रवादी पक्षाचे  सर्वेसर्वा  श्री शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर संपन्न
पालघर ( हिरारालाल लोखंडे)राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण देशाच्या समाजकारणात सक्रिय असणारे भारदस्त व्यक्तिमत्व मा. ना. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांच्याद्वारे जनसेवेचे विविध उपक्रम हाती घेण्यात आले होते. जिजाऊ संस्थेतर्फे आयोजित महारक्तदान शिबिराला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने माणुसकीची साक्षच जणू याप्रसंगी मिळाली. 
जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती, पालघर आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक तथा अध्यक्ष मा. श्री. निलेशजी सांबरेंच्या मार्गदर्शनाखाली जनकल्याणाच्या व्यापक असा उपक्रम अगदी यशस्वीरीत्या पार पडला. कोरोनासारख्या महाभयंकर रोगाने संपूर्ण राष्ट्रात थैमान घातले आणि कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच गेली. अशा प्रसंगी रुग्णालयांमध्ये रक्तपुरवठ्याची गरज अधिकच भासू लागली. अशा अगदी निकडीच्या क्षणी जिजाऊ संस्थेने ठाणे-पालघर जिल्ह्यात वाडा (पाली), विक्रमगड, जव्हार (साकुर), मोखाडा, तलासरी, डहाणू (निंबापूर महालेपाडा), तलासरी, पालघर (मनोर), कल्याण (खडवली), भिवंडी (पाच्छापूर), शहापूर (गोठेघर), मुरबाड (म्हसा), भिवंडी (पिसे), भिवंडी व भिवंडी शहर (टेमघर, अन्सार मोहल्ला) अशा एकूण १४ ठिकाणी महारक्तदान शिबीर आयोजित केले. 
मा. श्री. निलेशजी भगवान सांबरे यांच्या जनसेवेचे हाकेला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि एकूण ११२ रक्तदान शिबिरांमध्ये रक्तदानासाठी लोकांची जणू रांगच लागली. ठाण्यामध्ये एकूण २९४ रक्तदात्यांनी तर पालघरमध्ये एकूण ४९९ रक्तदात्यांनी ब्लड डोनेट करत या समाजकार्यामध्ये सहभाग घेतला. या व्यापक अशा उपक्रमाच्या मदतीने एकूण ७०१९ बॅग रक्तसंकलन करण्यास जिजाऊ संस्थेला यश मिळाले, ज्याचा फायदा आता हजारो गरजू रुग्णांना होईल. मा. श्री. निलेशजी भगवान सांबरे यांनी या सत्कार्यात हातभार लावण्यासाठी तरुणाईला आवाहन केले होते आणि युवकांनी आवर्जून रक्तदानाला हजेरी लावत हा उपक्रम सार्थ ठरविला. 

अशा विस्तृत उपक्रमासारखेच अनेक जनसेवेचे उपक्रम नागरिकांसाठी राबवून त्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी जिजाऊ संस्था भविष्यातही अविरतपणे कार्य करीत राहील असे प्रतिपादन मा. श्री. निलेशजी भगवान सांबरे यांनी याप्रसंगी बोलताना केले.

*दिग्गज वार्ताहर _सकाळच्या बातम्या_*दिनांक :- १५.डिसेंबर २०२०वार। :- मंगळवार

*दिग्गज वार्ताहर _सकाळच्या बातम्या_*
दिनांक :- १५.डिसेंबर २०२०
वार।    :- मंगळवार 

१) दिल्लीच्या सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांचे एक दिवसाचे उपोषण; आंदोलन देशाच्या इतर भागात, जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणीही निदर्शने

२) सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस; १९७५ मधील आणीबाणी घटनाबाह्य घोषित करण्याची याचिका

३) सैन्यदले देशाच्या रक्षणात कुठलीही कसूर करणार नाहीत; संरक्षण प्रमुख जनरल बिपीन रावत यांची माहिती

४) कृषी क्षेत्रास कुठलेही हानिकारक निर्णय घेण्याचा प्रश्नच येत नाही; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह; फिक्की वार्षिक सभा

५) लसीकरण आराखडा तयार; केंद्राच्या राज्यांना मार्गदर्शक सूचना; एका सत्रात १०० ते २०० जणांना लस

६) राज्यात २ हजार ९४९ नवे कोरोना रुग्ण आढळले; ४ हजार ६१० रुग्ण बरे होऊन घरी परतले; रिकव्हरी रेट ९३.५४ टक्के

७) शंभरहून अधिक जणांना कोरोना झाल्याने मद्रास आयआयटी बंद; आतापर्यंत ४४४ जणांचे नमुने घेतले असून १०४ जण निघाले बाधित

८) अमेरिकेत कोरोना प्रतिबंधक लसीचा दिला पहिला डोस; डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती; ट्रम्प यांनी जगाचे केले अभिनंदन

९) महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव अॅड. गोविंद शर्मा यांची भारतीय खो-खो महासंघाच्या कार्यकारी मंडळ सदस्यपदी बिनविरोध निवड

१0) अभिनेता सोनू सूदचा पुन्हा मदतीचा हात; ग्रामीण नवउद्योजकांचं करणार डिजिटल-आर्थिक सक्षमीकरण; 'स्पाईस मनी'शी केली भागीदारी

राष्ट्रवादीच्या पालघर विधानसभा अध्यक्षपदी महेश कोती

राष्ट्रवादीच्या पालघर विधानसभा  अध्यक्षपदी महेश कोती

 

       पालघर (रवि राठोड) राष्ट्रवादी पक्षाच्या पालघर विधानसभा अध्यक्षपदी महेश कोती यांची निवड करण्यात आली.प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने  राष्ट्रवादी पालघर जिल्हाध्यक्ष आमदार सुनिल भुसारा यांच्या हस्ते महेश कोती यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. पक्षाचे वअध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाने सोपवलेल्या  जबाबदारीचे भान ठेऊन  पवारसाहेब  यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करील. तसेच राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व जिल्ह्याचे प्रभारी जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी व पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचा मानस पालघर मतदारसंघ विधानसभा अध्यक्ष महेश कोती यांनी  व्यक्त केला. यावेळी कार्यक्रमाला बोईसर मतदार संघाचे आमदार  राजेश पाटील, पालघर  नगरपरिषदच्या नगराध्यक्षा उज्वला काळे आदी मान्यवर उपस्थित होते.दरम्यान सर्व धर्मीयांतील समाज बांधवांना सोबत घेऊन जाणारे व समाजसेवेची नितांत आवड असणारे महेश कोती हे
 पालघर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार असल्याची  चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.

भाजप चे राज्य उपाध्यक्ष खा. कपिल पाटील यांनी घेतली पत्रकार परिषद पालघर येथे , सोमवार,(रवि राठोड) दि. 14 डिसेंबर 2020, पालघर जिल्हा

भाजप चे राज्य उपाध्यक्ष खा. कपिल पाटील यांनी घेतली पत्रकार परिषद पालघर येथे 
, सोमवार,(रवि राठोड) दि. 14 डिसेंबर 2020, पालघर जिल्हा 
भारतीय जनता पक्षा तर्फे आज पालघर शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद आयोजित केली गेली होती. या वेळी भाजपा चे राज्य उपाध्यक्ष खा.कपिल पाटील यांनी पत्रकारांना संबोधित केले. त्यांनी दिल्लीत चालू असलेल्या शेतकरी आंदोलना विषयी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना, शेतकऱ्यांचे आंदोलन हे एक राजकीय स्टंट असल्याचे सांगितले, त्यांनी या  वेळी उदाहरण देताना सोसिअल मीडिया वर आलेली अचलपूर बाजार समितीची पेरू खरेदीची पावती बाबत सांगितले की महाराष्ट्रातील राज्य मंत्री शेतकरी आंदोलनाला पाठिंबा  देण्यासाठी दिल्लीला गेलेले आहेत, आणि त्यांच्याच मतदार संघातील बाजार समिती शेतकऱ्यांच्या पेरूला एक रुपया किलो अशी किंम्मत देत आहे, त्या साठी केंद्र सरकार ने हा कायदा आणला असून हा कायदा शेतकऱ्यांच्या कसा हिताचा आहे त्या बद्दल त्यांनी कोकणातील आंबे उत्पादक शेतकऱ्याचे उदाहरण दिले, त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांबद्दल बोलताना झोपलेल्याना जागे करता येते, पण झोपेचे सोंग घेतलेल्याना जागे करता येत नाही असे सांगितले, वाढवणं बद्दल त्यांची भूमिका विचारली असता, त्यांनी पत्रकारांना बोलण्यास नकार दिला, शेतकऱ्यांच्या जमिनी केंद्र सरकार विविध प्रकल्पा साठी घेत आहे, त्यात जो शेतकरी मर्जीने जमीन देईन त्याला २५% बोनस देण्यात येईल आणि मर्जीने नाही दिल्यास २५% तोट्यात जमिनी घेतल्या जातील असे सांगितले, या पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हा अध्यक्ष नंदू पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील,माजी आमदार पासकल धनारे,नगरसेवक अरुण माने, भाजप गटनेते भावानंद संखे,नगरसेविका सौ अनिता किणी, सौ लक्ष्मीदेवी हजारी सौ मोना मिश्रा आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीत तपोवन टाकळी परिसरात मोकळ्या मैदानात कचऱ्याच्या ठिकाणी आढळला तरुणीचा मृतदेह :अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल. नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.

भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीत तपोवन टाकळी परिसरात मोकळ्या मैदानात कचऱ्याच्या ठिकाणी आढळला तरुणीचा मृतदेह :अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल. 

 नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे. 
 तपोवन टाकळी परिसरातील लक्ष्मीनारायण पुलाकडील रामटेकडी या भागातील मोकळ्या मैदानात वीस ते पंचवीस वर्षे वयोगटातील तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
 याबाबत सविस्तर वृत्त असे की, डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून तरुणीचा मृतदेह रामटेकडी परिसरात कचऱ्याच्या ठिकाणी फेकून देण्यात आला, 
 या घटनेची माहिती मिळताच उपायुक्त अमोल तांबे, सह आयुक्त दीपाली खन्ना, पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांच्यासह इतर अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला व अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तरुणीचा मृतदेहाजवळ कुठल्याही प्रकारचे ओळखपत्र व कागदपत्रे आढळून आलेली नसल्याने व तिच्या शरीरावरील कपडेही फाटलेले असल्याने मृतदेहाची ओळख पटू शकली नाही 3 ते 4 दिवसापूर्वी खून झाला असावा अशी प्राथमिक माहिती पोलिस निरीक्षक पवार यांनी दिली, दरम्यान ग्रामीण व शहरी भागातील बेपत्ता महिलांची माहिती व तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. या घटनेची पुढील तपास व चौकशी पोलीस निरीक्षक पवार हे करीत आहेत.

Sunday, December 13, 2020

पंचवटी पोलीस स्टेशन तर्फे राबवलेल्या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान गावठी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त.

पंचवटी पोलीस स्टेशन तर्फे राबवलेल्या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान गावठी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त. 

 नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे. 
 पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीत हिरावाडी परिसरात कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान संशयित व्यक्तीची झाडझडती सुरू असताना त्याने आपल्याकडे गावठी कट्टा व 9 जिवंत काडतुसे असल्याचे कबूल केले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, 
 पंचवटी परिसरात वाढत असलेल्या गुन्हेगारीमुळे पंचवटी पोलीस स्टेशन तर्फे कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले त्या दरम्यान संशयित व्यक्ती सुरज परदेशी याच्या हालचाली संशयित वाटत असल्याने त्याची कसून चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे द्यायला सुरुवात केली दरम्यान पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवताच त्याने नातेवाईकाकडे गावठी कट्टा व नऊ जिवंत काडतुसे लपून ठेवले असल्याचे कबुल केले दरम्यान गावठी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले व सुरज परदेशी यावर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...