Wednesday, November 11, 2020

शिधापत्रिकाधारकांना २० रुपये प्रति किलो दराने साखर उपलब्ध*

*शिधापत्रिकाधारकांना २० रुपये प्रति किलो  दराने  साखर उपलब्ध*                                       पालघर(प्रतिनिधी) दि.११ :  सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील शिधापत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिका १ किलो प्रमाणे २० रुपये प्रति किलो या दराने  साखर १००% उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
                     वितरण व्यवस्थेसाठी एन.सी.डी. इ.एक्स स्पॉट एक्सचेंज लिमिटेड मार्फत अत्यंत आधुनिक व पारदर्शक पध्दतीने लाईक ऑक्शनच्या माध्यमातून त्यांचेकडील नोंदणीकृत Balran Kartamal, Akola यांच्याकडून पालघर जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमी तसेच दिपावली सणानिमित्त माहे नोव्हेंबर, २०२० साठी सार्वजनिक. वितरण व्यवस्थेअंतर्गत प्राधान्य कुटुंबातील लाभाथों शिधापत्रिकाधारक २८६७ क्विटल साखर प्राप्त होणार आहे. पालघर जिल्ह्यातील तालुकानिहाय गोदामांपर्यंत साखर पोहोचविणेसाठी संबंधितास सूचना देण्यात आल्या आहेत                                       .

Tuesday, November 10, 2020

अतिवृष्टी व पूरामूळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत वाटप

*अतिवृष्टी व पूरामूळे  बाधित झालेल्या  शेतकऱ्यांना तातडीने मदत वाटप*
       पालघर (प्रतिनिधी)जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ                                     पालघर दि.10:-माहे  जून ते ऑक्टोंबर  2020 या कालावधीत  अतिवृष्टी व पुरामूळे  पालघर जिल्हयातील बाधित झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत वाटप करणार असल्याचे.   जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ      यांनी सांगितले.                                         जिल्ह्यातील  62798 शेतकऱ्यांचे  25580.66 हेक्टर  क्षेत्राच्या  शेतीपिकांच्या  नुकसान झाले आहे. आपद्ग्रस्तांना शेतपीकांसाठी (जिरायत व आश्वासित सिंचनाखालील पिके) यापुवीच्या शासन  निर्णयानुसार  रु 6800/- प्रति  हेक्टरी  इतकी  तरतूद होती. त्यामध्ये  रु 3200/- प्रति हेक्टरी  वाढ  करुन  एकूण रु 10000/-प्रति हेक्टरी  दि. 9/11/2020  रेजीच्या  शासन निर्णयान्वये  मदत जाहिर केली आहे.
तसेच बहूवार्षिक  पिकांसाठी  यापुर्वीच्या  शासन निर्णयानुसार  रु 18000/- प्रति हेक्टरी  इतकी तरतूद  होती. त्यामघ्ये  रु 7000/- प्रति हेक्टरी  वाढ करुन एकूण  रु 25000/-प्रति हेक्टरी  दि 9 /11/2020 रोजीच्या  शासन निर्णयान्वये मदत जाहिर केली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ       यांनी सांगितले.                             
           निधी नुसार   रक्कम  रुपये 7,54,43000, (अक्षरी   सात कोटी चौपन्न लाख  त्रेचाळीस हजार )   रुपये  मात्र इतके  अनुदान शासन  महसूल  व  वनविभाग ( मदत व पुनवर्सन आ व्य.. प्रभाग)यांचेकडून प्राप्त. झाले आहे. सदरच्या  अतिवृष्टी व पूरामूळे  बाधित झालेल्या  शेतकऱ्यांना तातडीने मदत वाटप  करणे बाबत  जिल्हयातील  सर्व तहसिलदार यांना  आदेश   देण्यात आले आहे  असल्याचे जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसाळ यांनी सांगितले.

*बचत गटाच्या महिलांना विक्री कौशल्याच्या मार्गदर्शनाची गरज - जि.प.अध्यक्षा भारती कामडी*


*बचत गटाच्या महिलांना विक्री कौशल्याच्या मार्गदर्शनाची गरज -  जि.प.अध्यक्षा भारती कामडी*
   पालघर (प्रतिनिधी)पालघर जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या  उमेद अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत परंतु महिला तयार करत असलेल्या वस्तूंच्या जास्तीत जास्त  विक्री साठी योग्य ते  मार्गदर्शन असल्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन जि. प.अध्यक्षा भारती कामडी यांनी केले.
 
   जिल्हा आरोग्य आधिकारी कार्यालयाच्या आवारात उमेद मार्फत आयोजित करण्यात आलेल्या  स्वयं सहायता महिलांच्या दिवाळी फराळ व इतर वस्तूंचे प्रदर्शन व विक्री च्या दुकानांचे उद्घाटन आज जि.प.अध्यक्ष भारती कामडी यांच्या हस्ते जि.प.उपाध्यक्ष निलेश सांबरे, जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ,जि.प.मु.का.अ एस. के.सालीमठ,अति. मु.का.अ.चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालक माणिक दिवे यांच्या प्रमुख उपस्थितित करण्यात आले.त्यावेळी त्या बोलत होत्या.

  उपाध्यक्ष निलेश सांबरे यांनी या महिलांचे कौतुक करून उमेद मुळे ग्रामीण भागातील महिलांच्या हाताला काम मिळाले असू न रोजगाराची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.असे मत व्यक्त केले.
 
     जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणे मार्फत कोकण सरस व दिवाळी प्रदर्शना सारखे महत्वाचे उपक्रम राबवले जात असून ग्रामीण भागातील महिलांच्या कला कौशल्याला यामधून वाव मिळत असल्याचे मत यावेळी जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी व्यक्त केले. 

  तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. के.सालीमठ यांनी या प्रदर्शनात असलेल्या दिवाळी फराळ व वारली पेंटिंग असलेल्या कापडी पिशव्या तसेच सर्व उत्पादना बद्दल महिलांचे  कौतुक करून या उत्पादनाला विक्री साठी संधी मिळवून देण्यास  तसेच ऑनलाइन ही उत्पादने कशी विकली जातील यासाठी जिल्हा परिषदेकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील तसेच  असे सांगितले.

  फराळा चा व्यवसाय तर महिला करतात च परन्तु त्यासोबत दिवाळी मध्ये ड्राय फ्रुटस चे पॅकिंग देखील करण्याची संधी महिलांना मिळवून देता येऊ शकते.असे वित्त समिती सभापती   काशिनाथ चौधरी यांनी सूचित केले. 
    दिवाळी च्या आदल्या दिवसा पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार असून यात फराळ, विविध प्रकारच्या मेणबत्त्या, मसाले, तोरण, पणत्या अशा विविध वस्तू विक्रीस असून जास्तीत जास्त जनतेने भेट देऊन, खरेदी करून महिलांना प्रोत्साहन द्यावे असे विनंती वजा आवाहन  उमेद च्या लेखाधिकारी  तनुजा राणे यांनी केले आहे.

नाशिक मुंबई महामार्गावरील वाडीवऱ्हे पोलीस स्टेशन हद्दीत रोथे एर्ड कंपनीसमोर पिकअप आणि लक्झरी बस यांच्या अपघातात दोन ठार चार जखमी.

नाशिक मुंबई महामार्गावरील  वाडीवऱ्हे पोलीस स्टेशन हद्दीत रोथे एर्ड कंपनीसमोर पिकअप आणि लक्झरी बस यांच्या अपघातात दोन ठार चार जखमी.
 नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे 

 नाशिक मुंबई महामार्गावरील वाडीवऱ्हे पोलीस स्टेशन हद्दीत रोथे एर्ड कंपनी समोर पिकअप या वाहनाचे टायर फुटल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटून पिकअप दुभाजक ओलांडून मुंबईकडून इंदूर ला जाणाऱ्या लक्झरी बसला धडकली या अपघातात पिकअप मधील इगतपुरी तालुक्यातील योगेश दामू वाजे(35) खेडभैरव,  किरण शिवाजी बऱ्हे(30) अधरवड हे दोन जण ठार तर संदीप केकरे(27) हा तरुण जखमी झाला व बसमधील बसचालक रमेश यादव, फ्रेंक डी रिझारियो, नितीन धोपटे (इंदोर) हे जखमी झालेत. जखमींवर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 या अपघातात पिकअप वाहनाचा  चुराडा होऊन बस बाजूला खड्ड्यात जाऊन आदळली. वाडीवऱ्हे  पोलीस स्टेशन मध्ये अपघाताचा गुन्हा दाखल होऊन पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पाटील करीत आहे.

Monday, November 9, 2020

जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील तीन सझांच्या पुनर्रचना अधिसूचनेचा अंतिम मसुदा प्रसिध्द*

*जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील तीन सझांच्या पुनर्रचना अधिसूचनेचा अंतिम मसुदा प्रसिध्द*

*पालकमंत्री आदिती तटकरेंच्या प्रशासकीय दूरदृष्टीचा जिल्ह्याला होणार लाभ*

अलिबाग,जि.रायगड,दि.09 (जगधिश घरत) :- राज्यातील वाढती लोकसंख्या व वाढत्या नागरीकरणामुळे  क्षेत्रीय महसूल यंत्रणेच्या कामात झालेली वाढ विचारात घेता राज्यात एकूण 3 हजार 165 नवीन वाढीव तलाठी सझे व 6 तलाठी सझांसाठी 1 महसूली मंडळ या तत्त्वाप्रमाणे या वाढीव तलाठी सझांसाठी 528 नवीन महसूली मंडळे स्थापन करण्यास शासनाने यापूर्वीच मान्यता दिली हाेती. 
       रायगड जिल्ह्यासाठीदेखील 115 नव्याने निर्माण होणाऱ्या तलाठी सझांची संख्या शासनाने यापूर्वी निश्चित केली हाेती.     
         त्यापैकी जिल्ह्यातील माणगाव तहसिलमधील लोणेरे, साले व हरकोल या तीन तलाठी सझांची पुर्नरचना करण्याबाबत  नागरिकांची मागणी होती, या मागणीची तात्काळ दखल घेवून पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्हा प्रशासनास या तीनही सझांची पुनर्रचना  करण्याबाबतचे निर्देश दिले होते. त्यास अनुसरून या सझांच्या पुनर्रचनेबाबत अधिसूचनेचा अंतिम मसुदा जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी नुकताच प्रसिध्द केला आहे.
        रायगड जिल्ह्यातील उप विभाग माणगाव (तहसिल माणगाव) मधील पुनर्रचित तलाठी सझांचा तालुकानिहाय तपशिल पुढीलप्रमाणे:- 
             उप विभाग- माणगाव, ता.माणगाव, सजेचे नाव व सजाच्या मुख्यालयाचे ठिकाण-हरकोल (नवनिर्मित), सजेत समाविष्ट असलेल्या गावाचे नाव- गोवले, हरकोल, हरकोल कोंड, अळसुंदे, पळस्प, गोवले कोंड.
       उप विभाग- माणगाव, ता.माणगाव, सजेचे नाव व सजाच्या मुख्यालयाचे ठिकाण-साले, सजेत समाविष्ट असलेल्या गावाचे नाव- साले, कोशिंबळे त.तळे.
       उप विभाग- माणगाव, ता.माणगाव, सजेचे नाव व सजाच्या मुख्यालयाचे ठिकाण-साले, सजेत समाविष्ट असलेल्या गावाचे नाव- तिलोरे, वारक, कुशेडे, विघवली.                  
        सजेचे नाव व सजाच्या मुख्यालयाचे ठिकाण -तळाशेत(नवनिर्मित), सजेत समाविष्ट असलेल्या गावाचे नाव-तळाशेत, कशेणे, दाखणे.
        सजेचे नाव व सजाच्या मुख्यालयाचे ठिकाण -तळाशेत (नवनिर्मित), सजेत समाविष्ट असलेल्या गावाचे नाव-तळाशेत, कशेणे, दाखणे.
      सजेचे नाव व सजाच्या मुख्यालयाचे ठिकाण-लोणेरे, सजेत समाविष्ट असलेल्या गावाचे नाव-लोणरे, टेमपाले, लाखपाले, वडपाले, उसरघर.
       सजेचे नाव व सजाच्या मुख्यालयाचे ठिकाण-रेपोली, सजेत समाविष्ट असलेल्या गावाचे नाव-रोपोली, न्हावे, भाणदरे.
      प्रशासकीयदृष्ट्या ही बाब अत्यंत महत्त्वाची असून नवीन सजांच्या निर्मितीमुळे नागरिकांना प्रशासकीय सोयीसुविधा मिळण्यासाठी भविष्यात सुलभ व्यवस्था निर्माण होणार आहे.

कन्टोनमेंट झोनमध्ये फटाकेमुक्त दिवाळी साजरी करणेबाबत नाशिक जिल्हाधिकारी यांचे आदेश.

कन्टोनमेंट झोनमध्ये फटाकेमुक्त दिवाळी साजरी करणेबाबत नाशिक जिल्हाधिकारी यांचे आदेश. 
 नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे

 नाशिक येथे कन्टोनमेंट झोन मध्ये फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. या भागात फटाके फोडल्यास कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिले आहेत. दि. 10 नोव्हेंबरच्या रात्रीपासून हे आदेश लागू होणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. राज्यातील कोरोनाचे संकट पाहता दोन दिवसापूर्वीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले होते. फटाक्यापासून होणाऱ्या धुराने कोरोना पेशंट यांना श्वसनाचा त्रास होऊ शकतो व तो होऊ नये याची जबाबदारीही आपलीच आहे असे त्यांनी सांगितले व राज्यातील जिल्ह्यांना  तसे आदेश दिलेत त्यामुळे नाशिक जिल्हाधिकारी यांनी नाशकातील कन्टोनमेंट झोन मध्ये फटाके न फोडण्याचे आवाहन केले आहे व तसे केल्यास कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.

जिल्ह्यातील पाणी टंचाई वर मात करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे*- गुलाबराव पाटील

*जिल्ह्यातील पाणी टंचाई वर मात करण्यासाठी सर्वांनी    सहकार्य करणे  गरजेचे*- गुलाबराव पाटील 
   पालघर (प्रतिनिधी)जल जीवन मिशन हे आंदोलन असून हे प्रत्येक घरात पाणी पुरवण्यासाठी  हे मिशन राबवून जिल्ह्यातील पाणीटंचाई चा प्रश्न सोडवायचा असल्यास सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री  गुलाबराव पाटील यांनी केले आहे. 
 पालघर जिल्हा दौरा दरम्यान पालघर जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यासाठी  जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे आढावा बैठक आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते.
    पाणीटंचाई हा पालघर जिल्ह्यातील भीषण प्रश्न असून जिल्हाधिकारी यांच्यासोबत पूर्ण यंत्रणा या  मिशन मध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. 
मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. यांनी उपमुख्य कार्यकारी तथा गटविकास अधिकारी,   अधिकारी यांना मार्गदर्शन करून सर्व संबंधित अधिकाऱ्यांना यात समाविष्ट करून घेतले पाहिजे असे मतही या वेळी त्यांनी व्यक्त केले. तसेच पाणीपुरवठा योजनेतील प्रलंबित प्रश्नांचा येत्या दोन महिन्यात योग्य तो पाठपुरावा करण्यात यावा असे निर्देश यावेळी देण्यात आले.या
  
    या बैठकीदरम्यान राष्ट्रीय ग्रामीण  पेयजल कार्यक्रमांतर्गत प्रगतीपथावरील कामांचा घोषवारा,  कामाची संख्या, आर्थिक दृष्ट्या पूर्ण कामे, भौतिक दृष्ट्या पूर्ण योजना, भौतिक प्रगती,  कामे पूर्ण करण्याचे नियोजन तसेच  महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मधील प्रगतीपथावरील योजनांची माहिती, जल जीवन मिशन अंतर्गत प्रस्तावीत योजनांची माहिती,  प्रादेशिक नळ पाणी पुरवठा, पाणीपट्टी वसुली अहवाल , इत्यादी योजनांबद्दल विस्तृत आढावा घेण्यात आला. या आढावा बैठकीतस खा. राजेंद्र गावित जि. प.अध्यक्ष भारती कामडी,  महिला आर्थिक विकास
 महामंडळ अध्यक्ष ज्योती ठाकरे
 आ. सुनील भुसारा आ. राजेश पाटील आ.श्रीनिवास वनगा जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ,  मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आर.विमला,  मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.एस के. सालीमठ निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, प्रकल्प अधिकारी प्रजित नायर, पाणी पुरवठा प्रधान सचिव उपस्थित होते.

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...