Sunday, October 11, 2020

खासदार श्री राजेंद्र गावित साहेब ह्याच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे पालघर येथे पादचारी पुल व लिफ्टचे उद्घाटन*

*खासदार श्री राजेंद्र गावित साहेब ह्याच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे पालघर येथे पादचारी पुल व लिफ्टचे उद्घाटन*
पालघर (निलेश भोईर)शनिवार दिनांक १०/१०/२०२०  
आज पालघर रेल्वे स्टेशन वर  पुर्व  पश्चिम जोडणारा  पादचारी पुलाचे व लिफ्टचे उद्घाटन झाले .
पुलाची लांबी 98 मिटर लांब व 6 मिटर रुंद  आहे  ,हा पदचारी पुल प्लॅटफॉर्म नंबर 1- 2- 3   वर उतरतो ह्या मुळे पालघर शहरातील नागरीकांची अनेक वर्षाची  मागणी पुर्ण झाली ,तसेच नागरीकाना भाजी - मासे हे विकत घेताना पुर्व पश्चिम जाता येता येईल .
ह्या पादचारी पुलाचा बांधकाम खर्च रुपये पाच करोड  आहे .
ह्या पुलाचे बांधकम ऑक्टोबर २०१८ ला सुरु झाले होते व २०२० ला पुर्ण झाला .
ह्या उद्घाटन प्रसंगी पालघर नगराध्यक्ष डॉ सौ उज्ज्वला केदार काळे , पालघर डि व्हाय एस पी विकास नाईक ,उपनगराध्यक्ष उत्त्तम घरत ,स्टेशन मास्टर मिलींद कीर्तीकर ,शिवसेना पालघर  लोकसभा सहसमन्वयक केदार काळे ,तालुका प्रमुख विकास मोरे ,शहर प्रमुख भूषण संखे नगरसेवक रविंद्र म्हात्रे ,नगरसेवक चंद्रशेखर  वडे ,नगरसेविका  प्रियांका    म्हात्रे  भाजपा तेजराज हजारी ,नंदु पावगी ,चंदा दुबे ,निमेश शुक्ला व अनेक मान्यवर उपस्थित होते ,हे लोकार्पण व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे  रेल्वेचे  साह्यक मंडल प्रबंधक गुरु प्रसाद , वाणिज्य मंडळ प्रबंधक अभय सानन ,वरीष्ठ अभियंता  कैलास मिना हे उपस्थित होते .ह्या प्रसंगी मा खासदार श्री राजेद्र गावित म्हणाले  माझ्या लोकसभा मतदार संघात नायगाव ते घोलवड पर्यंतच्या प्रत्येक रेल्वे स्टेशनवर मी सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहे ,त्या साठी मी सतत प्रयत्न व पाठपुरावा करीत राहीन . मी रेल्वे मंत्री मा श्री पियुशजी गोयल  व पश्चिम रेल्वेच्या आधीकारी प्रशासन  ह्याना धन्यवाद देतो .
व भविष्यात एकत्र पणे विकासाची कामे करु .
नगराध्यक्ष डॉ उज्ज्वला केदार काळे म्हणाल्या जुन्या पालघर येथे पुर्वी रेल्वे पाटक होते ते बंद झाले म्हणून , पश्चिमेस हनुमान मंदिर व पूर्वेस जैन मंदिर असा पदचारी पुल रेल्वेने बाधुन द्यावा ,आजच्या पदराची पुला मुळे पालघरच्या जनतेची खुप सोय झाली आहे ,मा खासदार गावित साहेब व रेल्वे पदादिकारी ह्यांचे मी आभार मानते .

Saturday, October 10, 2020

लायन्स क्लब ऑफ पालघरचे सामाजिक उपक्रमात भरीव योगदान

लायन्स क्लब ऑफ पालघरचे सामाजिक उपक्रमात भरीव योगदान
पालघर (पंढरीनाथ गायकवाड ) लायन्स क्लब ऑक्टोबर महिन्यात ऑक्टोबर सर्व्हिस  वीक साजरा करतो. यावर्षी ‘समर्पण’ या शब्दाला केंद्रस्थानी ठेवून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. 
कोविड काळात ढवळे मेमोरियल ट्रस्टच्या इस्पितळात रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित मिळावा म्हणून लिक्विड ऑक्सिजन बॅक प्रकल्प उभारण्यासाठी दहा लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली. सदर प्रकल्प इस्पितळाच्या आवारात तातडीने  सुरू करण्यात आला. पाच लाख रुपये मुंबई येथील लायन्स क्लब ऑफ कार्टर रोड यांनी तर पाच लाख रुपये पालघर लायन्स क्लबने दिले.यासाठी पालघर मधील अनेक दानशूर लायन्स आणि इतर मान्यवरांनी आपले आर्थिक  योगदान दिले.
लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे हे लक्षात घेऊन देवखोप शेलवली तसेच तारापूर येथील आदिवासी पाड्यातील महिलांना अन्नदान करण्यात आले.
शिरगाव येथील आंनद वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील वयस्क ज्येष्ठांशी सुसंवाद साधत त्यांना वाफयंत्र, चादर तसेच मास्कचे वाटप करण्यात वाटप करण्यात आले. 
देवखोप येथील गोशाळेतील जनावरांना एक वेळच्या चाऱ्यासाठी आर्थिक मदत देण्यात आली तसेच तेथे काम करणाऱ्या कामगारांना चादर आणि मास्क वाटप करण्यात आले. पोलिसांना तसेच रिक्षाचालकांना देखील मास्क वाटप करण्यात आले. गरजु महिलांना दोन शिवणयंत्राचे वाटप करण्यात आले.
नेशन फर्स्ट या  उपक्रमातर्गत  ‘राष्ट्रासाठी आपण काय योगदान देतो’ या विषयावर  ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. एनएसएस, एनसीसी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पालघर परिसरात समाजोपयोगी ऑक्टोबर सर्विस वीक राबवण्यासाठी लायन्स क्लबचे अध्यक्ष अतुल दांडेकर, सचिव पराग दोशी, खजिनदार विवेक कुडू आणि इतर पदाधिका-यांनी सदस्यांनी  विशेष मेहनत घेतली.

दिग्गज वार्ताहर* बातम्यादिनांक :-११.१०.२०२०वार :- रविवार

*दिग्गज वार्ताहर* बातम्या
दिनांक :-११.१०.२०२०
वार :- रविवार



● सीबीआयने स्विकारली हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या तपासाची सूत्रं; योगी सरकारने केंद्राकडे केली होती शिफारस

● चित्रपट अभिनेत्यांपेक्षा अमली पदार्थांचे विक्रेते आणि संघटित टोळीवर कारवाई करण्याकडे अधिक लक्ष द्यावं; केंद्राचे एनसीबीला आदेश

● भारतीय वंशाचे शिक्षणतज्ज्ञ श्रीकांत दातार यांची हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या (एचबीएस) अधिष्ठातापदी निवड; ११२ वर्षांच्या इतिहासात सलग दुसऱ्यांदा भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड


● महाराष्ट्रात ११ हजार ४१६ नवे कोरोना रुग्ण, मृतांची एकूण संख्या ४० हजारांवर; महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट ८२. ७६ टक्के झाला आहे

● राज्यातील ३२ साखर कारखान्यांना ५१६ कोटी ३० लाखांच्या कर्जाला हमी; राज्य शासनाचा निर्णय

● आसाममध्ये सरकारी मदरसे आणि संस्कृत शाळा होणार बंद; भाजपा सरकारचा निर्णय

● जगात २.९० कोटी महिला आजही गुलामगिरीत; कोविड १९ मुळे आधुनिक गुलामगिरीत भर पडली असून आणखी लोक त्यात ढकलले गेले आहेत

● लडाख सीमेवर चीनकडून ६० हजार सैन्य तैनात, अमेरिकेचा दावा; "चीनविरोधातील लढाईत भारताला अमेरिकेच्या मदतीची गरज"

● आयपीएल २०२० : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ३७ धावांनी विजय; चेन्नईचा ५ वा पराभव, विराट कोहली ठरला मॅन ऑफ द मॅच 

● बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी बॉम्ब'च्या ट्रेलरचा धुमाकूळ; २४ तासात ७ कोटी व्ह्यूज

कोविडग्रस्त मुलांसाठी मानसिक समुपदेशनासाठी केंद्र शासनाची “संवेदना” टोल फ्री टेलि-कौन्सिलिंग सेवा कार्यान्वित*

*कोविडग्रस्त मुलांसाठी मानसिक समुपदेशनासाठी केंद्र शासनाची “संवेदना” टोल फ्री टेलि-कौन्सिलिंग सेवा कार्यान्वित*

     अलिबाग,जि.रायगड, दि.09 (जगधिश घरत) :-  राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग (एनसीपीसीआर) व इंडिया को-विन ॲक्शन नेटवर्क (आय-सीएएन) यांच्या संयुक्त प्रयत्नातून टोल फ्री “संवेदना”                                
(SAMVEDNA- Sensitizing Action on Mental Health Vulnerability through Emotional Development and Necessary Acceptance)टेलि-कौन्सिलिंग च्या माध्यमातून मानसिक प्रथमोपचार आणि भावनिक आधार देण्यासाठी नेटवर्क तयार करण्यात आले आहे.1800-121-2830 या टोल फ्री क्रमांकावर सोम ते शनि सकाळी 10.00 ते  दुपारी 1.00 तसेच दुपारी 3.00 पासून ते रात्रौ 8.00 पर्यंत  ही सेवा  उपलब्ध आहे.  जी मुले कोविड-19 आजारामुळे ग्रस्त आहेत, ज्यांना विलगीकरण कक्षात किंवा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे, यांच्यातील ज्या मुलांना  मानसिक आधाराची व समुपदेशनाची आवश्यकता आहे, अशा मुलांच्या उत्तम मानसिक आरोग्यासाठी हा टोल फ्री क्रमांक व त्याद्वारे होणारे समुपदेशन निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. यासाठी काम करणाऱ्या सल्लागारांना प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने तांत्रिक सहाय्य “निमन्स” (NIMHANS) ने केले आहे.
       कोविड -19 या संकटाचा सर्वांनी अभूतपूर्व सामना केला आहे आणि कोविड -19 च्या वेगवेगळ्या स्तरावरील सर्वात महत्वाची चिंता म्हणजे लोकसंख्येच्या वेगवेगळ्या घटकांच्या मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम.  अशा संकटाच्या वेळी, विशिष्ट गटांच्या, विशेषत: मुलांच्या भावनिक आणि मानसिक गरजा, ज्यांना कोविड-19 पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाल्यामुळे वेगळे केले गेले आहे आणि म्हणूनच त्यांना रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यास भाग पाडले गेले आहे, त्यांना तीव्र पातळीवर तणाव, चिंता याबाबतही तोंड द्यावे लागले आहे. भीती, चिंता, नैराश्य, भूक न लागणे  त्याचप्रमाणे ज्या मुलांनी आपले पालक / कुटुंब गमावले आहेत किंवा ज्यांचे पालक / भावंडे, कुटुंबातील सदस्य विलगीकरण केंद्रात किंवा रूग्णालयात आहेत, अशी मुले अत्यंत तणावाखाली असण्याची वा चिंताग्रस्त असण्याची मोठी शक्यता आहे. या मुलांच्या  मानसिक आरोग्य स्वस्थ  राहण्याच्या दृष्टीने ही सेवा सुरु करण्यात आली आहे.

Friday, October 9, 2020

*एमपीएससीची रविवारी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय*

*एमपीएससीची रविवारी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय*

*_नव्या तारखेस होणाऱ्या परीक्षेस सध्याचे पात्र उमेदवार बसू शकणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे_*

मुंबई, दि. ९(प्रतिनिधी) : - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून रविवार ११ ऑक्टोबर २०२० रोजी घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. या परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना पुढे नव्याने जाहीर होणाऱ्या परीक्षेस बसता येणार असून कुणीही अपात्र ठरणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती आणि विविध घटकांशी केलेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, जलसंपदा जयंत पाटील, परिवहन मंत्री अनिल परब, खासदार अनिल देसाई उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, गेल्या चार महिन्या पासून कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालये, अभ्यासिका वर्ग बंद आहेत. या परिस्थितीचा तसेच विविध घटकांकडून, विद्यार्थ्यांकडून आलेल्या सूचनांचा सारासार विचार करून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यापुर्वीही दोन वेळेस ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती आणि काही उमेदवार कोरोनाग्रस्त असल्याने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेचा सुधारित कार्यक्रम राज्य सेवा आयोगाकडून स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. ११ ऑक्टोबर २०२० च्या परीक्षेत प्रवेश पत्र देण्यात आलेल्या सर्व उमेदवारांस सुधारित दिनांकाच्या परीक्षेत बसता येईल. म्हणजेच जाहिरातीनुसार वयोमर्यादा गणण्याचा दिनांक १ एप्रिल २०२० हाच कायम राहील.

000

Monday, October 5, 2020

दैनंदिन योग्यता प्रमाणपत्र तपासणीसाठी ठेवण्यातआलेल्या कोट्यात दि. 01 आक्टोबर 2020 पासून वाढ

दैनंदिन योग्यता प्रमाणपत्र तपासणीसाठी ठेवण्यात
आलेल्या कोट्यात दि. 01 आक्टोबर 2020 पासून वाढ

पालघर (रवि राठोड) दि. 05 :- पालघर जिल्ह्यातील सर्व जनतेला कळविण्यात येते की, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, वसई येथे योग्यता प्रमाणपत्र साठीचा प्रतीक्षा कालावधी कमी करण्याच्या दृष्टीकोनातून कार्यालयातील कामकाजाच्या दैनंदिन योग्यता प्रमाणपत्र तपासणीसाठी ठेवण्यात आलेल्या कोट्यात दि. 01 आक्टोबर 2020 पासून खालीलप्रमाणे वाढ करण्यात येत आहे.

हलके मालवाहू वाहन – 30
मध्यम / जड मालवाहू वाहन – 40
********

दिनांक :- 05 ऑक्टोबर 2020राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकररोपवाटिका उभारणीसाठी 19 ऑक्टोबर 2020 पर्यंत अर्ज करावे

दिनांक :- 05 ऑक्टोबर 2020
राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
रोपवाटिका उभारणीसाठी 19 ऑक्टोबर 2020 पर्यंत अर्ज करावे
         पालघर (निलेश भोईर)दि. 05 :- राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गतच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजनेंतर्गत राज्यात 500 रोपवाटीकांची उभारणी करण्यात येणार आहे. टोमॅटो, वांगी, कोबी, फुलकोबी, मिरची, कांदा आदि व इतर भाजीपाल्याची प्रत्येक रोपवाटीका उभारणीसाठी 4 लाख 60 हजार रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी 50 टक्के म्हणजे 2 लाख 30 हजार रूपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अथवा तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे ऑफलाईन पद्धतीने दि. 02 ऑक्टोबर 2020 ते 19 ऑक्टोबर 2020 पर्यंत अर्ज करावा लागेल.
रोपवाटीकांसाठी  11 कोटी 50 लाख रूपयांचा निधी मंजूर झालेला आहे. राज्यातील सर्व तालुक्यात ही योजना राबविण्यात येणार असून प्रत्येक तालुक्यात किमान एक रोपवाटीका उभारण्याचे प्रस्तावित आहे. भाजीपाला रोपवाटीकेसाठी एक हजार चौरस मीटरचा सव्वातीन मीटर उंचीचे शेडनेटगृह (सांगाडा), एक हजार चौरस मीटरचे प्लॅस्टिक टनेल, पॉवर नॅपसॅक स्पेअर, 62 प्लॅस्टिक क्रेट यांचा रोवपाटीकेच्या प्रकल्पात समावेश असेल. अर्जदाराकडे स्वत:च्या मालकीची किमान 0.40 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. रोपवाटीकेसाठी पाण्याची कायमची सोय असणे आवश्यक असेल. महिला कृषि पदवीधारकांना पहिले प्राधान्य असेल. महिला गट, महिला शेतकऱ्यांना दुसरे, तर भाजीपाला उत्पादक अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी, शेतकरी गटांना तिसरे प्राधान्य असेल.
रोपवाटीका पूर्णपणे नव्याने उभारावयाची आहे. पात्र अर्जानुसार सोडत पद्धतीने शेतकऱ्यांच्या उपस्थितीत प्राधान्यक्रमानुसार निवड केली जाईल. तालुका स्तरावर प्राप्त उद्दिष्टानुसार स्थाळाची पाहणी करून हमीपत्र घेतल्यावर उद्दिष्टाच्या अधिन राहून पुर्वसंमती देण्यात येईल. त्यानंतर पंधरा दिवसांच्या आत काम पुर्ण करून तीन महिन्यात पुर्ण करणे आवश्यक आहे. तसेच रोपवाटीकाधारकास बियाणे कायदा 1966 अंतर्गत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचेकडून परवाना घेणे बंधनकारक राहील. उपविभागीय कृषि अधिकारी यांचेकडून पहिली तपासणी केल्यावर 60 टक्के अनुदान बँक खात्यात जमा होईल. मोका तपासणीवेळी रोपवाटीकेचे Geo-Tagging करणे बंधनकारक आहे.  रोपांची प्रत्यक्ष विक्री अथवा उचल झाल्यावर मंडळ कृषि अधिकारी यांनी दुसरी तपासणी केल्यावर 40 टक्के अनुदान बँक खात्यात दिले जाईल. राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी सबंधित तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन श्री. के.बी. तरकसे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर यांनी केले आहे.
*******

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...