१७ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू मोरवणे डाॅम मध्ये सफाळे पुर्व
प्रतिनिधी सफाळे
दिनांक १आॅगस्ट २०२१ रोजी तन्मेश विकास तरे वय वर्षे १७ धंदा शिक्षण ,राहणार मुक्काम पोस्ट एडवण ता,जि पालघर. हा मोरवणे डाॅम रोडखड पाडा सफाळे पुर्व पोस्ट उंबरपाडा ता,जि पालघर येथे दुपारी फिरण्यासाठी आला असताना, पाण्यात पोहता येत नसताना, व पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने तो डाॅमच्या पाण्यात बुडून मयत झाला आहे. तसेच त्याच्या मरणाच्या बाबत संशय किंवा तक्रार नाही. अशी माहिती गोपनीय सुत्रांनकडुन मिळत आहे.
घटनास्थळी सफाळे पोलीस ठाणे ता,जि पालघर येथील कार्यरत कर्मचारी श्री पंकज पाटील पोलीस उपनिरीक्षक, श्री बाबासाहेब चेमटे पोलीस उपनिरीक्षक, श्री आत्माराम बोरसे पो.ह, श्री कैलास शेळके पो. नाईक ,श्री सचिन मोरे पो. नाईक, श्रीसिद्धेश्वर सानप पो. काॅन्सटेबल यांनी घटना स्थळी भेट दिली असून,, श्री राजेश म्हात्रे उपसरपंच ग्रा. पंचायत सफाळे सर्प मित्र टिमचे श्री प्रशांत मानकर ( पिंट्या ) युगल हाडळ, येशू डिमेलो, जिद्देश पाटील, रोहन पवार, कुणल वर्ग, अंकुश जाधव आदि यांनी पाण्यात असलेल्या मृत देहाचा शोध घेऊन, मृत देहास बाहेर काढण्यासाठी मदत केली.
Good coverage bhai
ReplyDelete