Friday, April 2, 2021

सफाले( W. R.) रेल्वे स्टेशन कमिटी स्थापना

सफाले( W. R.) रेल्वे स्टेशन कमिटी स्थापना 
 ( हिरालाल लोखंडे )दिनांक २ एप्रिल २०२१ रोजी रेल्वे संदर्भात दैनंदिन प्रवास करणार्‍या प्रवाश्यांना येणाऱ्या समस्या लोकशाही मार्गाने सोडविण्यासाठी " वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या " अंतर्गत सफाळे रेल्वे स्टेशन कमिटीची श्री नामदेव - वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष यांच्या पुढाकाराने व दयानंद पाटील, प्रथमेश प्रभुतेंडोलकर, ,हितेश सावे, महेश पाटील यांच्या सहकार्याने स्थापन करण्यात आली आहे. 
 श्री जतिन कदम ( सर ) महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक -- अध्यक्ष, संदीप म्हात्रे - उपाध्यक्ष, शैलेंद्र घरत - सहसचिव, अक्षय सत्पाळकर - कोषाध्यक्ष, मोनाली तरे - सहकोषाध्यक ,सदस्य म्हणून - श्री अमोद जाधव सरपंच सफाळे ग्रामपंचायत, श्री राजेश म्हात्रे उपसरपंच, प्रतिभा कदम, प्रशांत मानकर, अनंता कुडू, नितिन बोबांडी पत्रकार,डाॅ अमित चौधरी, डाॅ रोहन बाबर, डाॅ अरूण घरत, जगदीश किणी सर, महेंद्र पाटील सर, आदी मान्यवर सदस्य आहेत

No comments:

Post a Comment