जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार दि. ०५/०४/२०२१ रोजी दु. ०१ वा. ऑनलाईन
पालघर (प्रतिनिधी)दि. ०१ : मा.सह सचिव, महाराष्ट्र शासन यांचेकडील दि.२३/११/२०२० रोजीच्या परिपत्रकान्वये कोविड-१९ च्या परिस्थितीमध्ये लोकशाही दिनाचे आयोजन परिस्थितीनुरुप करण्यासाठी जिल्हाधिकारी सक्षम असल्याबाबत सुचित केलेले आहे. तसेच लॉकडाऊन टप्प्या-टप्प्याने शिथील करण्यात येत असल्याने लोकशाही दिनाचे आयोजन परिस्थितीनुरुप व शक्य असल्यास दूरचित्रवाणी परिषदेव्दारे (Video Conferencing) अथवा अर्जदारांच्या संमतीने शक्य असल्यास Google Meet, Zoom App इ.अॅपचा वापर करुन करण्यात यावे. ज्या ठिकाणी कोविड-१९ चा प्रादुर्भाव कमी व अर्जदारांना कार्यालयात बोलाविणे शक्य असेल त्या ठिकाणी सार्वजनिक आरोग्याच्या अनुषंगाने छोटया संख्येच्या गटात सक्षम बोलावून लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात यावे अशा सूचना दिलेल्या आहेत.
त्याअनुषंगाने माहे एप्रिलचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दि. ०५/०४/२०२१ रोजी दुपारी १.०० वाजता मा. जिल्हाधिकारी महोदय यांचे अध्यक्षतेखाली Google Meet व्दारे आयोजित करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment