वासिंद ( हिरालाल लोखंडे ) पोलिस स्टेशन वासिंद जिल्हा ठाणे येथील कार्यरत पोलिस निरीक्षक श्री सुदाम शिंदे साहेब हे डॅशिंग अधिकारी म्हणून ओळख आहे. पावसाळ्यात येणारी नैसर्गिक आपत्कालीन परिस्थिती असो की मानव निर्मित परिस्थिती यांच्याशी सक्षम सामना करणारे , करोना प्रादुर्भावात आपल्या कर्मचारी सह रात्र आणि दिवस जनतेच्या रक्षणासाठी सातत्याने काम करणारे अधिकारी आहेत. श्री शिंदे साहेब यांनी कोव्हिडा १९ वासिनेशन चे डॉक्टर यांच्या मार्गदर्शन खाली दोन डोस घेतलेले असताना सुध्दा त्यांना कोरानाची लागण झाल्याची धक्कादायक बातमी माहिती सुत्रांनकडुन मिळत आहे. सुदाम शिंदे साहेब यांचे कुटुंब सध्या ठाणे येथील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. तरी कृपया जनतेस एकच सांगणे आहे, रात्र वै-याची आहे सावध रहा. आपली काळजी आपणच घ्यावी.
No comments:
Post a Comment