Saturday, April 3, 2021

मा. जिल्हाधिकारी साहेब, यांच्या मनाई आदेशचा भंग !लग्न आयोजक, डी जे मालकावर गुन्हे दाखल

मा. जिल्हाधिकारी साहेब, यांच्या मनाई आदेशचा भंग !
लग्न आयोजक, डी जे मालकावर  गुन्हे दाखल 
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) मा. डाॅ. माणिक गुरसाळ - जिल्हाधिकारी साहेब, पालघर यांचे कोविडा १९ प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या दृष्टिकोनातून विवाह समारंभात ५० लोकांची मर्यादा, व कोविडा १९ मधील मार्गदर्शक सुचना पालन करण्याच्या अटीवर लग्नसमारंभास परवानगी राहिल, या अटीवर परवानगी असताना, दिनांक २ एप्रिल २०२१ रोजी केळवा सागरी पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे टेंभिखोडावे येथील  सखाराम शांताराम पाटील वय वर्ष ६० यांनी त्यांच्या राहत्या घरी, मुलांच्या लग्नाच्या हळदीचा समारंभ आयोजित केलेला. समारंभात मा. जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशांचे उल्लंघन करीत विना मास्क, डी जे तालावर नाचणार्‍या ५० पेक्षाही अधिक लोकांचा एकत्र समुदाय आढळून आल्यावर श्री भीमसेन गायकवाड साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक - केळवा सागरी पोलीस स्टेशन यांनी आयोजक शांताराम पाटील, रा. टेंभिखोडावे डी जे मालक सुभाष कदम रा. राजनपाडा विराथन बुद्रुक. यांच्यावर भारतीय दंड संविधान कलम १८८प्रमाणे कारवाई करण्यात आली असून. पुढील तपास वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी  आपल्या कर्मचारी यांच्या सहाय्याने करीत आहे

No comments:

Post a Comment