Thursday, April 1, 2021

वकील कु. मिथिला दिपक सावले हिचे सुयश

वकील कु. मिथिला दिपक सावले हिचे सुयश

पालघर (प्रतिनिधी)पालघर येथील सुप्रसिद्ध वकील श्री. दिपक चिंतामण सावले यांची मुलगी आणि वकील श्री. मिहीर दिपक सावले यांची लहान बहीण कु. मिथिला दिपक सावले हिने बंगलोर येथील सुप्रसिध्द नॅशनल लॉ स्कूलमधून मास्टर्स इन बिझेनेस लॉ (MBL)  हा पदव्युत्तर अभ्यासक्रम यशस्वी रित्या पूर्ण केला आहे. पालघर तालुक्यात हा नामांकित अभ्यासक्रम पूर्ण करणारी मिथिला ही तिसरी व्यक्ती आहे. भारताचे सरन्यायाधीश यांची स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर मिळते. मिथिलाचे  प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे भगिनी समाज शाळेमध्ये झाले आणि त्यापुढील बारावीपर्यंतचे शिक्षण सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात झाले. मिथिलाच्या या यशात वडिलांचे तसेच भावाचे  बहुमोल मार्गदर्शन लाभले . विधी क्षेत्रातील पदवी संपादन केल्याने कौटुंबिक वसा जोपासत जनसेवा करण्याचा मानस मिथिलाने व्यक्त केला आहे. तिला मिळालेल्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment