Wednesday, March 31, 2021

पडघे येथे आदर्श शाळा योजनेअंतर्गत कोकुयो कॅम्लिन लिमिटेड यांच्या सीएसआर फंडातून उभारण्यात आलेल्या मिनी सायन्स सेंटरचे उद्घाटन संप्पन.

पडघे येथे आदर्श शाळा योजनेअंतर्गत कोकुयो कॅम्लिन लिमिटेड यांच्या सीएसआर फंडातून उभारण्यात आलेल्या मिनी सायन्स सेंटरचे उद्घाटन संप्पन.
पालघर (प्रतिनिधी)आज दि. 31 मार्च 2021 रोजी आश्रमशाळा पडघे येथे आदर्श शाळा योजनेअंतर्गत कोकुयो कॅम्लिन लिमिटेड यांच्या सीएसआर फंडातून उभारण्यात आलेल्या अद्ययावत आणि सुसज्ज अश्या *मिनी सायन्स सेंटर* चे उद्घाटन आणि हस्तांतरण सोहळा कोव्हीड 19 च्या पार्श्वभूमीवर सर्व मार्गदर्शक तत्वे पाळून पार पडला 
याप्रसंगी कोकुयो कॅम्लिन लिमिटेड चे डॉ. चंद्रशेखर देशमुख (मुख्य मानव संसाधन अधिकारी CHRO) , श्री. किशोर वठे, (उपाध्यक्ष कोकुयो कॅम्लिन ) , श्री. अजित राणे , माधुरी वर्तक इत्यादी 
तसेच 
लायन्स क्लब ऑफ तारापूर चे डॉ. सूर्यकांत संखे, डॉ. रत्नाकर माने आणि माजी अध्यक्षा सौ. छाया शाह यादेखील उपस्थित होत्या
ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विश्वस्त श्रीमती दामिनी राऊत, कार्याध्यक्ष नितीन वझे, अनिल तरे, भूषण पाटील मुख्याध्यापक श्री. सुधाकर पाटील इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
स्टेम लर्निंग चे सदानंद शेट्टी देखील उपस्थित होते , त्यांनी या प्रयोगशाळेच्या अनेक प्रयोगांची प्रात्यक्षिके करून दाखवली.

याप्रसंगी डॉ. देशमुख , डॉ. संखे आणि किशोर वठे यांनी मार्गदर्शन करताना उपलब्ध करून दिलेल्या अद्ययावत आणि सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळेचा जास्तीत जास्त फायदा विद्यार्थ्यांनी करून घेऊन आपल्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्याची अपेक्षा व्यक्त केली. 
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जयेश संखे सर यांनी केले. 

याप्रसंगीची काही क्षणचित्रे

No comments:

Post a Comment