Wednesday, March 31, 2021

जिल्हा परिषदेच्या २९६ कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा लाभ– पदोन्नती निवड समितीचा महत्वपूर्ण निर्णय


जिल्हा परिषदेच्या २९६ कर्मचाऱ्यांना  सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा लाभ– पदोन्नती निवड समितीचा  महत्वपूर्ण निर्णय

      पालघर (प्रतिनिधी)मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली सामान्य प्रशासन विभाग, ग्राम पंचायत, महिला व बाल कल्याण, बांधकाम, पशु संवर्धन आणि कृषी या विभागातील वर्ग ३ व वर्ग ४ च्या अधिकारी व कर्मचारी याना सातव्या वेतन आयोगानुसार १०,२०,व ३० वर्षांच्या नियमित सेवे नंतर ची  ३  लाभांची सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर करणेबाबत दि. २४/३/२०२१ रोजी निवड समिती सभा घेण्यात आली होती या सभेमध्ये  सदर विभागातील एकूण २९६  कर्मचाऱ्यांना  एकाच वेळी सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय निवड समितीचे अध्यक्ष सिद्धाराम सालीमठ यांनी दिला.
निवड समितीचे सह अध्यक्ष अति.मु.का.अ.चंद्रकांत वाघमारे, सदस्य सचिव उप.मु.का. अ. (साप्रवि) संघरत्ना  खिल्लारे, सदस्य  उपमुख्य वित्त व लेखा अधिकारी  नितीन ओगले आणि  जिल्हा समाज कल्याण अधिकारी वैभव सापळे यांच्या उपस्थितीत हि निवड समिती सभा पार पडली. 
सामान्य  प्रशासन विभागाच्या एकूण १४० अधिकारी व कर्मचाऱ्यांना हा लाभ देण्यात आला. यात सहायक प्रशासन अधिकारी १, कनिष्ठ प्रशासन अधिकारी ३ विस्तार अधिकारी  (सांख्यिकी) ४, वरिष्ठ सहायक १९, कनिष्ठ सहायक ३७, वाहन चालक १४,  तर शिपाई ६२  यांचा यात समावेश आहे. ग्राम पंचायत विभागातील  ग्राम सेवक ३०, ग्राम विकास अधिकारी १०, विस्तार अधिकारी (पं )५ अशा एकूण ४५ लाभार्थ्याना लाभ मिळाला. महिला व बाल कल्याण विभागातील ३४ मुख्य  सेविकाना  सुधारित  आश्वासित प्रगतीचा लाभ देण्यात आला असून पशु संवर्धन विभागातील सहा. पशुधन विकास अधिकारी ७ तर पशुधन पर्यवेक्षक ६ अशा एकूण १३  जणांना तर कृषी विभातील एक पंचायत समिती विस्तार  अधिकारी याना या योजनेचा लाभ  देण्यात आला.  बांधकाम विभागातील शाखा अभियंता ५,  सहा. अभियंता (श्रेणी २ ) १, कनिष्ठ  आरेरख ३, कानिष्ठ सहायक १, तर मैल कामगार ५३ अशा एकूण ६३ अधिकारी व कर्मचारी यांना  पात्र ठरवण्यात आले.  
  ठाणे जिल्हा परिषदेत कार्यरत असल्या पासून सदर चे जे कर्मचारी   या लाभापासून वंचित होते  त्यांना मु. का. अ सिद्धाराम सालीमठ यांनी एकाच बैठकीत  हा लाभ मिळवून दिला. मु.का.अ यांच्या या निर्णयामुळे सेवानिवृत्ती कामी सदर कर्मचाऱ्यांना या लाभाचा फायदा होणार असून विविध कर्मचारी संघटनानी त्यांचे आभार मानले. तर कर्मचारी वर्गाने याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

*जिल्ह्यात बऱ्यापैकी प्रलंबित लाभार्थी होते त्यांना लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे.उर्वरित कर्मचाऱ्यां देखील  लाभ मिळवून देण्यासाठी  विशेष मोहीम घेऊन लाभ मिळवून दिला जाईल.*
सिद्धाराम सालीमठ,मुख्य कार्यकारी अधिकारी.

No comments:

Post a Comment