Sunday, March 28, 2021

चाफेवाडी - विराथन बुद्रुक प्रीमियर लीग २०२१ - संपन्न

चाफेवाडी - विराथन बुद्रुक प्रीमियर लीग २०२१ - संपन्न
पालघर(  हिरालाल लोखंडे ) दिनांक २४ मार्च २०२१ रोजी चाफेवाडी विराथन बुद्रुक ( मर्यादित ) येथे प्रीमियर लीग २०२१ क्रिकेट सामने आयोजित करण्यात आलेले. या खेळामध्ये गावातील
 १) स्पृहा स्टार संघ श्री शशिकांत घरत २) खुशी ११ संघ श्री अल्पेश भोईर ३) रिद्धी सिध्दी संघ श्री दशरथ घरत ४) आर्या संघ श्री महेश घरत. या एकूण चार संघांनी खेळात भाग घेतलेला. 
श्री कामनिष राऊत, श्री कुंदन राऊत, श्री सचिन पाटील, श्री दत्तात्रेय पाटील, श्री प्रदीप घरत, श्री दिनकर किणी आदी प्रमुख पाहुणे म्हणून बक्षीस समारंभात व्यासपीठावर विराजमान होते. प्रथम विजेता संघ स्पृहा स्टार, द्वितीय विजेता संघ खुशी ११, उत्कृष्ट फलंदाज ट्रॉफी श्री आशु भोईर, उत्कृष्ट गोलंदाज ट्रॉफी श्री प्रणय पाटील, मालिका वीर उत्कृष्ट ट्रॉफी श्री सुरेंद्र घरत, विजेते संघ - उत्कृष्ट फलंदाज - गोलंदाज यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. प्रथम विजेता स्पृहा स्टार संघ  मालक श्री  शशिकांत घरत, कर्णधार कुमार प्रणय पाटील, सुरेंद्र घरत, शुभम घरत, आशु भोईर, योगेश घरत, भूपेश घरत, पद्माकर घरत, सारंग घरत, अजय किणी, गणेशा घरत, धैर्य घरत, रविंद्र किणी, मिलींद किणी, आदी, कोव्हिडा १९ च्या नियमांचे पालन करित सामन्यांचे आयोजन आयोजकांनी केले असल्याचे आयोजकांनी सांगितले  आहे.

No comments:

Post a Comment