Monday, March 29, 2021

होळी साजरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केळवा सागरी पोलिस स्टेशन

होळी साजरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल 
केळवा सागरी पोलिस स्टेशन  ( हिरालाल लोखंडे ) मा. जिल्हाधिकारी साहेब पालघर यांचा मनाई आदेश असताना ही सागरी पोलिस स्टेशन केळवा हद्दीतील मौजे आगरवाडी, माकुणसर गावातील अतिउत्साही आयोजकांनी गावकर्‍यांना एकत्र करून होळी साजरी करून जिल्हाधिकारी पालघर यांच्या आदेशाचे उल्लंघन केले असल्याने, आगरवाडी राममंदिर पटांगणात होळी आयोजक विकास गावड वय ५५ वर्ष , प्रकाश गावड वय ५० वर्ष ,व आयोजकांनी एकत्र जमवलेला अंदाजे ८० ते ९० लोकांचा जमाव. माकुणसर येथील होळी आयोजक, कमलाकर पाटील वय वर्ष ६० नितीन आॅमकार वय ३५ वर्षे व जमलेला समुदाय अंदाजे १०० ते १२५ माणसे यांच्या वर श्री भीमसेन गायकवाड साहेब प्रभारी अधिकारी केळवा सागरी पोलिस स्टेशन यांनी आपल्या कर्मचारी वर्गाच्या सहकार्याने अंदाजे २०० लोकांवर गुन्हे दाखल केले असून वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सूर आहे.. पालघर जिल्हाधिकारी साहेब, मा, पोलिस अधिक्षक साहेब पालघर यांच्या आदेशानुसार नांदगाव बीच  सांज रिसॉर्ट येथेही कारवाई करून ४७ व्यक्तीनवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 
    करोनाचा वाढत्या प्रभावामुळे मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी आज दिनांक २९ मार्च २०२१ मध्यरात्रीपासून ते १४ एप्रिल २०२१ पर्यंत संपूर्ण पालघर जिल्हा बंदिचे आदेश दिलेले असून प्रभावित शेत्र वसई विरार महानगरपालिका, बोईसर - सफाळे ग्रामपंचायत विभागात जनतेला रस्त्यावर फिरण्यासाठी तसेच वाहने फिरवण्यासाठी मज्जाव केलेला आहे

No comments:

Post a Comment