Sunday, March 28, 2021

ओमटेक्स आयसीडब्लूसी क्रिकेट इन्स्टिट्यूटतर्फे गुणवत्ता शोध कार्यक्रम

ओमटेक्स आयसीडब्लूसी क्रिकेट इन्स्टिट्यूटतर्फे गुणवत्ता शोध कार्यक्रम
सफाळे(प्रतिनिधी)ओमटेक्स आयसीडब्लूसी क्रिकेट इन्स्टिट्यूट, सफाळे या संस्थेने गुणवत्ता शोध कार्यक्रम जाहीर केला आहे.
ओमटेक्स आयसीडब्लूसी क्रिकेट इन्स्टिट्यूट या संस्थेने सफाळे येथे आठ एकर परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे.या प्रशिक्षण केंद्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान व इन डोअर क्रिकेट प्रशिक्षण केंद्र विकसित करण्यात आले आहे.इनडोअर प्रशिक्षण केंद्रात ईबाको या जर्मन कम्पनीकडून टर्फ बसविण्यात आले असून पिच व्हिजन ह्या इंग्लड मधील कंपनीचे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.गुणवन्त क्रिकेटपटूंना  तंत्रशुद्ध व आधुनिक प्रशिक्षणाचा लाभ मिळावा या उद्देशाने या संस्थेने दि.२, ३ व ४ एप्रिल रोजी टॅलेंट हंट कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.या कार्यक्रमा अंतर्गत दि.२ एप्रिल रोजी १९ वर्षा खालिल, दि.३ एप्रिल रोजी १६ वर्षा खालिल तर ४ एप्रिल रोजी १४ वर्षा खालिल क्रिकेटपटूसाठी निवड चाचणी घेण्यात येणार आहे.या निवड चाचणीतून प्रत्येक गटातून एक गुणवंत मुलगा व एका मुलीची निवड करण्यात येणार आहे.निवड झालेल्या गुणवन्त क्रिकेटपटूंना तज्ञ क्रिकेट प्रशिक्षकांकडून एक वर्ष विनामूल्य प्रशिक्षण शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.अधिक माहितीसाठी 9321438723 या क्रमांकावर सम्पर्क साधावा.या योजनेचा गुणवन्त क्रिकेटपटूंनी लाभ घ्यावा असे आवाहन ओमटेक्स आयसीडब्लूसी क्रिकेट इन्स्टिट्यूटचे प्रकल्प प्रमुख माजी कसोटीपटू श्री.सुरू नायक यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment