*मनसे वाहतूक सेना भिवंडी शहरकडून सफाई कर्मचाऱ्यांचा जाहीर सत्कार*
भिवंडी (गिरीश देव) आज दिनांक १९/०९/२० रोजी सन्मा. राज साहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन, सन्मा. संजय नाईक साहेब (अध्यक्ष, वाहतूक सेना, महाराष्ट्र राज्य ), रोहिदास पाटील साहेब (जिल्हा संघटक, वाहतूक सेना ), संतोष म्हात्रे साहेब (तालुका संघटक, वाहतूक सेना, भिवंडी ) यांच्या अनमोल मार्गदर्शनाने आज भिवंडी शहरातील गुलजार नगर, इंदिरा गांधी हॉस्पिटल परिसरातील आरोग्य निरीक्षक, मुकादम,सर्व सफाई कर्मचाऱ्यांचा कोरोनाच्या कालावधीत जीवावर उदार होऊन सफाईचे काम प्रामाणिकपणे केल्याबद्दल भिवंडी शहर वाहतूक सेना संघटक श्री फिरोज शेख(भिवंडी पूर्व ) व शकील शेख (भिवंडी पश्चिम )यांनी त्यांचा जाहीर सत्कार केला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भिवंडी मनसे शहराध्यक्ष श्री मनोज वामन गुळवी उपस्थित होते. त्याचप्रमाणे सरवर खान (उपशहर संघटक, वाहतूक सेना ), दत्ता ताळे (उपशहर संघटक, वाहतूक सेना पच्छिम ), वासिम अन्सारी (सहसचिव, मनसे ), सुनील नाईक (सहसचिव, मनसे ), सईद शेख, महेश धुमाळ, सुशील आवटे, आदिकरून शेकडो मनसेसैनिक उपस्थित आले. मनोज गुळवी साहेबांनी सफाई कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धे म्हणून त्यांचा शब्द सुमनांनी गौरविले.
सर्व सफाई कर्मचारी या सत्काराने भारावून गेले.
No comments:
Post a Comment