Sunday, August 1, 2021

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कायम स्वरूपात अग्निशमन दलाची गाडीची गरज !अॅम्बुंलन्स संख्या वाढवावी .डॉक्टर सौ. उज्ज्वला काळे - पालघर नगराध्यक्ष

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कायम स्वरूपात अग्निशमन दलाची गाडीची गरज !
अॅम्बुंलन्स संख्या वाढवावी .डॉक्टर सौ. उज्ज्वला काळे - पालघर नगराध्यक्ष
 
डहाणू ( हिरालाल लोखंडे ) मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठ ( ८ ) या वरील वसई ते तलासरी या परिसरात वारंवार अपघात होत असतात. तर अनेकदा अपघातानंतर किंवा अचानक पणे चालत्या गाडीला आग लागते. अश्या प्रसंगी अग्निशमन दलाची गाडी ( फायर ब्रिगेड ) जवळपास उपलब्ध नसल्याने जळत असलेले वाहन वाचविता येत नाही. ( दोन तिन दिवसापुर्वी तारापूर येथील गाडीला महामार्गावर लागलेली आग ) या विभागात अपघाताचे प्रमाण अधिक आहे. परंतू महामार्गावर अपघात झाल्यानंतर अपघात स्थळी अॅम्बुंलन्स येण्यासाठी बराच वेळ जातो. त्यामुळे अपघात झालेल्या व्यक्तीची मृत्युमुखी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अपघात झाल्यानंतर कमीतकमी १० / १५ मिनीटांत घटनास्थळी अॅम्बुंलन्स पोहचू शकेल अशा ठिकाणी अॅम्बुंलन्स ठेवण्यात यावी. अॅम्बुंलन्स संख्या वाढती असावी. 
दिनांक १ आॅगस्ट २०२१ रोजी राष्ट्रीय महामार्ग आठ वरील चारोटी तालुका डहाणू जिल्हा पालघर येथील श्री दीपक पाठक - आर बी आय टोलनाका अधिकारी यांची वरिल विषया संदर्भात डॉक्टर सौ. उज्ज्वला काळे नगराध्यक्षा पालघर व श्री केदार काळे - शिवसेना लोकसभा  पालघर सहसमन्वयक यांनी भेट घेऊन चर्चा केली असताना, आर बी आय कंपनीने चारोटी टोलनाका ता. डहाणू जि. पालघर व खानिवडे टोलनाका ता. वसई  जि. पालघर येथे एक एक कर्डीक अॅम्बुंलन्स तसेच अग्निशमन दलाची गाडी ( फायर बिग्रेड ) कायम स्वरूपात उपलब्ध करावी.  अशी मागणी केली आहे. हा प्रश्न लवकरत लवकर सोडवावा. असा आग्रह केला असताना श्री दीपक पाठक आर बी आय चारोटी टोलनाका मॅनेजर यांनी, सकारात्मक भूमिका घेत, मी वरिष्ठ पातळीवर असलेल्या सक्षम अधिकारी यांच्याशी संपर्क साधुन आपल्या मागणी संदर्भात वरिष्ठ अधिकारी यांच्या सोबत आपली बैठक आयोजित करून, वरील समस्या सोडवण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्यासाठी आश्वासन दिले असल्याची माहिती श्री केदार काळे यांच्या कडून मिळत आहे.

No comments:

Post a Comment