मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसी मधील विद्यार्थांचे जी पॅट परीक्षेत घवघवित यश.
नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.
एकलहरे येथील मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसीच्या फायनल वर्षाचा विद्यार्थ्यांनी जी पॅट परीक्षेत खूप चांगल्या मार्कांनी पास होवून घवघवित यश संपादन केले आहे.
मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसीने दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी जी पॅट परिक्षेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. एम फार्मसीच्या प्रवेशासाठी जी पॅट ची परीक्षा घेतली जाते. या परिक्षेत महाविद्यालयातील राहुल मोरीया, ऋतुजा विखे, आदित्य खेरूडकर, पूजा गांगुर्डे, तेजस्विनी सोनावणे, अपेक्षा मोरे, अक्षय गिते या विद्यार्थांनी सर्वाधिक गुण मिळवून यश संपादन केले आहे. विद्यार्थांचे हे यश आणि सर्वाधिक जी पॅट परीक्षेचा निकाल लागण्यासाठी फार्मसी कॉलेजच्या सर्व शिक्षकांनी आणि प्राचार्य डॉ.गोकुळ तळेले सर यांनी खूप प्रयत्न केले. प्राचार्य सर बी.फार्मसी विभाग प्रमुख सचिन कापसे सर आणि डी. फार्मसी विभाग प्रमुख प्रशांत चव्हाण सर यांच्या संमतीने विद्यार्थ्यांसाठी सेमिनार आयोजित केले तसेच सुसज्ज ग्रंथालय, पुस्तकांची उपलब्धता, लॅब मधील प्रात्यक्षिके आणि वेळोवेळी विद्यार्थांच्या टेस्ट सिरीज घेण्यात आल्या. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या समन्वयामुळे मुलांची अभ्यासात अधिक रुची वाढली आणि विद्यार्थांना अवघड विषय सोपे होऊन समजण्यास मदत झाली. प्राचार्य डॉ. गोकुळ तळेले यांच्या मार्गदर्शनामळे कोविड काळात शिक्षकांनी विद्यार्थांना जी पॅट चे व्हिडिओ, पी. पी. टी., तसेच गेस्ट लेक्चर घेऊन जास्तीत जास्त महिती विद्यार्थ्यांपर्यंत पोचविली. मातोश्री एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री.कुणाल दराडे यांनी विद्यार्थ्यांचे आणि सर्व शिक्षक वर्गाचे अभिनंदन केले, तसेच फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.गोकुळ तळेले तसेच सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सर्व यशस्वी विद्यार्थांना परिश्रमपूर्वक अध्यापन करणाऱ्या मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसी च्या शिक्षकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment