Tuesday, March 23, 2021

श्री महेश टेटांबे - पत्रकार,आदर्श सेवा पुरस्काराने सन्मानित

श्री महेश टेटांबे - पत्रकार,
आदर्श सेवा पुरस्काराने सन्मानित 
सोलापूर ( हिरालाल लोखंडे ) श्री महेश टेटांबे यांना सोलापूर जिल्हयातील धाकटी - सांगोला येथील जिजामाता मल्टिपर्पज सभागृहात, लोकप्रिय दैनिक तुफान क्रांतीच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते " आर्दश सेवा " सन्मान पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले, या प्रसंगी श्री मिर्झा गलिब  मुजावर, - संपादक, तुफान क्रांती, श्री सुधाकर भागाडे - नायब तहसिलदार, श्री फैजुम मुजावर, श्री रजाक मुजावर, श्री राहुल खरात - पत्रकार,आदि मान्यवर उपस्थित होते.श्री टेटांबे यांनी अनेक सिनेमा - मालीका मध्ये अभिनय केलेला असून ई टीव्ही वरील क्राईम डायरी या लोकप्रिय मालिकेतील ५०० हून अधिक एपिसोड केलेले आहेत. ते स्वतः सिनेनाट्य दिग्दर्शक असून त्यांनी वेबससीरिज स्वार्थ, शिदोरी, ७७७ रूपयात बाबा, अश्या अनेक लघुचित्रपटाचे लेखन - दिग्दर्शन केलेले आहे. त्यांना स्वतःच्या " पुरस्कार " या एकांकिकेवर आधारित मराठी चित्रपट बनविण्याचा मानस आहे. त्यांना आता पर्यंत पत्ररत्न, पत्रमहर्षी, पत्रविभुषण, जागृत पत्रलेखक, समाज रत्न, समाज भूषण असे एकापेक्षा अनेक पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेले आहे. त्यांचे अनेक चाहते असून त्यांच्या कार्यांचे सर्व स्तरातील जनते कडुन अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा त्यांना देण्यात येत आहे .
श्री लक्ष्मण राजे यांच्या कडुन प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे

No comments:

Post a Comment