Thursday, January 28, 2021

या मातृभूमीसाठी

या मातृभूमीसाठी ! 
  (काव्यगीत)

या मातृभूमीसाठी
खेळ खेळतो गडी जीवाशी
या भारतात माझ्या 
नाही तमा पराजयाची,
'गड' राखतो युगा-युगाची
या भारतात माझ्या। । धृ । । 

संस्कार हेच आमचे
रक्षा  करी  देशाचे
ज्योत निष्ठेची पेटवतो
घर जाळूनी स्वताःचे
स्वदेश प्रेमासाठी
बनवी मशाल रणा-रणाची
या भारतात माझ्या । । १। । 

धडधडत्या स्पंदनांना
जरी वेध दुश्मनांचे
दीन-दुबळ्या जणांना
हृदय लाभते 'सुरांचे'
मानवतेसाठी मन हे
साक्ष देईल क्षणा-क्षणाची 
या भारतात माझ्या । । २। । 

दृष्टांत आहे आमुच्या, 
येथल्या घरा-घराला
देश रक्षणाच्या कामी,
माय जन्मते वीराला
त्याग भावना भूमीला,
आहे गंध हा कणा-कणाला
या भारतात माझ्या । । ३। । 


©️®️ श्री .वसावे एन.के.
C/04 साई आशिष अपार्टमेंट माहीम रोड,
पालघर (प.)ता.जि.पालघर -401404
                📞9923766502

No comments:

Post a Comment