Tuesday, January 12, 2021

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व एपीएल (केशरी) शेतकरी योजनेतील शिधापत्रिका* *लाभार्थ्यांनी मोबाईल क्रमांक व आधार सिडींग करावे*

*राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व एपीएल (केशरी) शेतकरी योजनेतील शिधापत्रिका* *लाभार्थ्यांनी मोबाईल क्रमांक व आधार सिडींग करावे*

पालघर (प्रतिनिधी)दि. 12 : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व एपीएल (केशरी) शेतकरी योजनेतील शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक व आधार सिडींग 100% पूर्ण करण्याचा केंद्र शासनाच्या सूचना आहेत.               सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी मोहिम राबवून लाभार्थ्यांचे आधार व मोबाईल सिडींग सुधारणे आवश्यक आहे. याकरिता रास्त भाव दुकानांतील ई - पॉस उपकरणांमधील eKYC व मोबाईल सिडींग सुविधेचा अधिकतम वापर करुन आधार व मोबाईल क्रमांक सिडींगचे प्रमाण वाढविण्यात यावे, अशा सूचना शासनाकडून प्राप्त झाल्या आहेत. त्यानुषंगाने दिनांक 31 जानेवारो 2021 पूर्वी प्रत्येक रेशनकार्डमध्ये लाभार्थ्यांचे 100%, आधार सिडींग आणि किमान एक वैध मोबाईल क्रमांक सिड करण्याचा उद्दिष्ट पूर्तीसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व एपीएल (केशरी) शेतकरी योजनेतील शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड आणि किमान एक वैध मोबाईल क्रमांक तात्काळ रास्त भाव धान्य दुकानदारांकडे जमा करावा.
दिनांक 31 जानेवारी, 2021 पर्यंत आधार सिडीग न झालेल्या लाभाध्याचे अनुज्ञेय धान्य पुढील महिन्यापासून आधार सिडींग होईपर्यंत निलंबित करण्यात येईल . असे जिल्हा पुरवठा अधिकारी, यांनी कळविले आहे..

*********

No comments:

Post a Comment