Wednesday, January 13, 2021

नाशिक येथील मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसी येथे स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी

नाशिक येथील मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसी येथे स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी.

नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.

मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसी ऐकलहरे मध्ये स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. एस. तळेले यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना मानवंदना दिली व सांगितले की राजमाता जिजाऊ यांनी केलेल्या संस्कारामुळे शिवाजी राजे घडले. लहानपणापासून ते स्वराज्य निर्मितीच्या काळापर्यंत जिजाऊ माँ साहेब शिवरायांच्या गुरू होत्या. राष्ट्रासाठी शिवरायांसारख्या न्यायप्रिय, स्रियांचा आदर करणारे, धैर्यवान, चारित्र्यवान, कर्तृत्ववान युवक घडवणे प्रत्येक मातेचे पवित्र कार्य आहे त्यासाठी आपण राजमाता जिजाऊ यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. जर घरोघरी शिवाजी राजे जन्माला यायचे असेल तर प्रत्येक आईने जिजाऊ झाले पाहिजे असे प्राचार्य तळेले यांनी सांगितले. तसेच स्वामी विवेकानंद यांची माहिती देताना सांगीतले की, व्यक्तीने आपले ध्येय साध्य होत नाही तो पर्यंत थांबायचे नाही आणि अविरतपणे  प्रामाणिक कष्ट करावे तसेच थोडक्यात त्यांचा जीवनपट सांगितला. समजदार व्यक्तीसोबत काही मिनिटे केलेली चर्चा ही हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे असे सांगीतले.
यावेळी कार्यक्रमास प्राचार्य डॉ.गोकुळ तळेले, प्रा.मालपुरे सर, प्रा.व्यवहारे सर, प्रा.पूनम शिंदे, ग्रंथपाल प्रतीक्षा गुळस्कर तसेच इतर शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्तित होते.

No comments:

Post a Comment