वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली नाशिक रोड पोलीस ठाणे यांचेकडून सर्व जनतेला सतर्कतेचे आवाहन.
नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे
कोरोना काळातील मागील सहामाही संपून शहरातील परिस्थिती पूर्वपदावर येत असताना सध्या चोरी, घरफोडी व चेन स्नॅचिंगचे प्रमाण खूप वाढले आहे असे असून सध्या दीपावलीचा सण सुरू होत आहे त्यानिमित्ताने बाजारात खरेदीसाठी गर्दी होत आहे तरी सर्वांनी कोरोना नियमांचे पालन करावे आणि महिलांनी बाजारात जाताना आपले मंगळसूत्र जपावे व मौल्यवान वस्तू, रोख रक्कम घरी ठेवून जाऊ नये.
दीपावली निमित्त बाहेरगावी जाताना आपल्या मौल्यवान वस्तू व पैसे बँकेत ठेवणे किंवा सोबत घेऊन जाणे. व्यापारी दुकानदार व सराफ यांनीही या काळात मोठ्या प्रमाणात माल खरेदी केलेला असतो व या काळात खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होतात तरी दुकानदारांनी रात्रीच्या वेळेस कडक सुरक्षाव्यवस्था ठेवावी.
जनतेने कुठल्याही प्रकारच्या ऑनलाईन व्यवहाराच्या आमिषाला बळी पडू नये. आपल्या परिसरामध्ये किंवा आपल्या कॉलनीत काही संशयित हालचाली, संशयित इसम किंवा काही अनुचित प्रकार दिसून आल्यास नाशिक रोड पोलीस ठाणे 0253- 2465533/133 या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली नाशिक रोड पोलीस ठाणे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment