Tuesday, September 29, 2020

माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेचा दादडे येथे शुभारंभ

*'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेचा दादडे येथे शुभारंभ*

पालघर (निलेश भोईर) 
महाराष्ट्र शासनामार्फत दि .१५ / ० ९ / २०२० ते २५/१०/२०२० पर्यंत राबविण्यात येणाऱ्या " माझे कुटुंब माझी जबाबदारी " या मोहीमेचा शुभारंभ दि .२८/०९/ २०२० रोजी मौजे दादडे येथे पार पडला . 
  सदर मोहीमेचे उदघाटन पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा  भारतीताई कामडी यांच्या हस्ते करण्यात आले . कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा सभापती आरोग्य व शिक्षण समिती निलेश सांबरे आणि पालघर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी  सिध्दाराम सालीमठ ( भा.प्र.से. ) उपस्थित होते .
Track, test & treat या त्रिसूत्री चा वापर करून प्रशासन या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी झटत आहे तरी जनतेने 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहन  जि.प अध्यक्ष यांनी केले.
सर्व कर्मचाऱ्यांची स्तुती करताना उपाध्यक्ष निलेश सांबरे  यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने अशा कठीण प्रसंगी कौतुकास्पद कार्य केले आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी न डगमगता कोरोनाच्या काळात आपले कार्य पार पडले. 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम संपूर्ण पालघरमध्ये यशस्वीरीत्या राबवून जिल्ह्याचा आदर्श महाराष्ट्र राज्यासमोर ठेवण्यात येईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
सॅनिटायजर ,मास्क आणि सामाजिक अंतराचे  पालन करणे ही काळाची गरज आहे असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यावेळी नमूद केले व कार्यक्रमास जन सहभागातून यश असल्याने स्वयंसेवकांचा सहभाग वाढविण्यासाठी सन्माननीय  उपस्थित लोकप्रतिनिधीना विनंती केली. कार्यक्रमास जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
सदर कार्यक्रमास विक्रमगड तालुक्याचे तहसिलदार श्रीधर गालीपेल्ली , पंचायत समिती उप सभापती  नम्रता गोवारी , जि.प.सदस्य  संदेश ढोणे,  गणेश कासट उपस्थित होते . 
सदर कार्यक्रम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . दयानंद सुर्यवंशी यांनी आयोजीत केला होता .तर कार्यक्रमाचे सुत्र संचालन डॉ . श्रीकांत दत्तात्रय कुलकर्णी, डॉ . गणेश आहेर , डॉ . विजय ठक्कर  यांनी केले . 

यावेळी दादडे येथील ग्रामस्थ , आशा कार्यकर्ती , अंगणवाडी कार्यकर्ती , आरोग्य कर्मचारी व पत्रकार उपस्थित होते . 

कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन डॉ . सागर पाटील अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा पालघर यांनी केले .

No comments:

Post a Comment