Tuesday, September 29, 2020

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना अंमलबजावणीकरीता* *जिल्हास्तरीय मंजुरी व सनियंत्रण समिती स्थापन

*प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना अंमलबजावणीकरीता* 
*जिल्हास्तरीय   मंजुरी व सनियंत्रण   समिती स्थापन*


पालघर (रवि राठोड)दि. 29 :  प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृषी व पदुम विभाग शासन निर्णय क्र.मत्स्यवि 1020/प्र.क्र.80/पदुम 14, दि. 29 जून, 2020 अन्वये केंद्र पुरस्कृत योजना प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना अंमलबजावणीकरीता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार राज्य शासनाने राज्यस्तरीय मंजुरी व सनियंत्रण समिती आणि जिल्हास्तरीय समिती स्थापन करून संबंधित समितीची  स्थापना केली. 
समितीची  रचना व कार्यकक्षा खालील प्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी, पालघर यांनी दि. 09/09/2020 रोजीच्या जिल्हास्तरीय सभेत सदरहू योजनेचा जिल्ह्यामध्ये अधिकाधिक प्रसार व प्रचार करण्यात यावा असे  निर्देश दिले आहेत.
जिल्ह्याचा वार्षिक कृती आराखडा तयार करून मान्यतेसह राज्यस्तरीय  मंजुरी व सनियंत्रण समितीस सादर करणे, जिल्हा स्तरावर योजनेची अंमलबजावणी व संनियंत्रण करणे, लाभार्थ्यांना वित्तीय पुरवठ्यासाठी बँका आणि वित्तीय संस्थांत समन्वय निर्माण करण्यास मदत करणे, योजने अंतर्गत प्राप्त प्रस्तावांना मान्यतेसह राज्यस्तरीय मंजुरी व सनियंत्रण समितीस सादर करणे.
“ प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY) या योजनेव्दारे मत्स्यव्यवसाय क्षेत्रात क्रांती घडुन येणार आहे. कारण या योजनेमार्फत आधुनिक तंत्रज्ञानासह पायाभूत सुविधा व आर्थिक सहाय्य सुनिश्चित होईल आणि याचा लाभ कष्टकरी मच्छीमार व मत्स्यकास्तकारांना होईल.” केंद्र शासनामार्फत मत्स्यव्यवसाय हा पुरक व अग्रक्रमीत व्यवसाय करण्याचे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे. व याव्दारे सामाजीक व आर्थिकदृष्ट्या कमकूवत पारंपरीक मच्छिमारांचे/मत्स्यव्यवसायीकांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
शाश्वत आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत व रोजगार निर्मीतीच्या संधी निर्माण करणे. केंद्र पुरस्कृत योजना प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना अंमलबजावणीकरीता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार योजनांचे प्रमुख 3 भाग (Annexture) आहेत.
Annexture I –  प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजने अंतर्गत 100% केंद्रिय निधिसह केंद्रिय क्षेत्राच्या  योजना व  उपघटक 
समुद्री शेवाळ, तिलापिया, जिताडा, कोळंबी इ. सारख्या प्रजातींच्या अनुवांशिक सुधार कार्यक्रम राबविणाऱ्या संस्थांना अर्थसहाय्य करणे, नाविन्यपूर्ण प्रकल्प / उपक्रम, स्टार्टअप्स, इनक्यूबेटर आणि पथदर्शी प्रकल्पासह  आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देणे, माशाच्या साठ्यांचा योग्य वापर, मत्स्यपालन क्षेत्रात नवीन प्रगती, कुपोषण रोखण्यासाठी नाविन्यपूर्ण पध्दती, शोभिवंत मत्स्यपालनास प्रोत्साहन देण्यासारखे अभिनव पध्दती सार्वजनिक ठिकाणी / शाळा / सरकारी कार्यालयांमध्ये Aquarium बसविणे किंवा केंद्रीय   शिख्रर  समितीने (CAC) मंजूर केलेल्या कोणत्याही अन्य उपक्रमास या उपघटकांतर्गत सहाय्य करणे, मत्स्यव्यवसायामध्ये मासळी विलगीकरण कक्ष (Quarantine unit) उभारण्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट  आणि व्याप्ती म्हणजे मासळीची आयात करताना सूक्ष्म जीवाणू जलचर आणि जलचर  उत्पादनांच्या माध्यमातून देशात येणा-या धोकादायक विदेशी रोगांचा प्रवेश रोखणे, प्रशिक्षण, जागरूकता, प्रदर्शन व क्षमता वाढवणे, मत्स्योत्पादक संघटना / कंपन्या  निर्माण करण्यास चालना देणे. 
Annexture II –केंद्र पुरस्कृत योजना प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजने अंतर्गत लाभार्थीभिमुख असलेले उपघटक व उपक्रम 
नविन मत्स्यबीज उत्पादन केंद्राची स्थापना, नविन कोळंबी बीज उत्पादन केंद्राची स्थापना, नविन मत्स्यसंवर्धन/संगोपन तलाव खोदकाम, गोडया पाण्यातील मत्स्यसंवर्धन निविष्टा अनुदान, निमखा-यापाण्यातील कोळंबी व मत्स्यसंवर्धन, निमखा-यापाण्यातील कोळंबी व मत्स्यसंवर्धन निविष्टा अनुदान, बायोफ्लॉक पद्धतीने संवर्धन निमखारे पाणी व भुजल, जलाशयामध्ये बोटुकली संवर्धन, खुल्या समुद्रातील केज (पिंजरा) संवर्धन, समुद्र शैवाल संवर्धन्‍, शिंपले संवर्धन, शोभिवंत माशांचे संगोपन व प्रजनन, पुनर्चक्रिय पद्धतीने मत्स्यसंवर्धन्‍  RAS, जैव पुंज (बायोफ्लॉक) पद्धतीने मत्स्यसंवर्धन, शितगृह बर्फकारखाना उभारणी, रेफ्रिजरेटर व इन्सुलीटेड वाहन खरेदी, मोटर सायकल सह शितपेटी, सायकल सही शितपेटी, ऑटो रीक्शा सह शितपेटी, जिवंत मासळी विक्रि केंद्र, मत्स्यखाद्या कारखाना उभारणे.
यामध्ये प्रकल्प खर्चाच्या 40 टक्के ते 60 टक्के पर्यत सर्वसाधारण,ते अ.जा व अ.ज तसेच महीलांसाठी  शासनाकडून (केंद्र व राज्य) अनुदान अनुज्ञेय आहे.
Annexture III–लाभार्थीभिमुख नसलेल्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत  केंद्र पुरस्कृत योजना 
यामध्ये जिल्ह्यातील जेटी व बंदर सुविधा निर्माण करणे.
तरी सदरहू महत्वकांक्षी प्रधानपंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत सागरी, भुजल व निमखारेपाणी मत्स्यव्यवसाय क्षेत्रामध्ये अधिकाधिक शाश्वत व शास्त्रोक्त मत्स्योत्पादनास वाव असून कृपया सदरच्या योजनांचा प्रसार व प्रचार होणेकरीता कृपया स्थानिक वृत्तपत्रात वरील लाभार्थीभिमुक योजनांची माहीती व मार्गदर्शन घेण्याकरीता सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय्‍, रॉयल पॉईंट-2, कचेरी रोड, ता.व जि. पालघर  कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधण्याबाबत तसेच दुरध्वनी वरून श्री अजिंक्य देवकाते 9405056810, अमोल सोनोने 8899999770 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय अंजिक्य पाटील यांनी केले आहे.
********************

No comments:

Post a Comment