कांद्रेभुरे - बेलपाडा ता,जि पालघर, वृक्ष रोपण कार्यक्रम संपन्न
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) सुनंदा चॅरिटेबल अॅन्ड एज्युकेशन ट्रस्ट पुरस्कृत, अनुसया राजाराम सांगवेकर वाचनालय, कै. अनंत दाजी वझे वाचनालय यांच्या संयुक्तरित्या विद्यमाने दिनांक १६ जुलै २०२१ रोजी ग्रामपंचायत कांद्रेभुरे ता,जि पालघर येथील बेलपाडा व कांद्रेभुरे येथे प्रभारी पोलीस अधिकारी श्री भीमसेन गायकवाड सहा. पोलीस निरीक्षक केळवा सागरी पोलीस ठाणे ता,जि पालघर. यांच्या हस्ते नवतरूण पिढीला साक्ष ठेवत वृक्ष रोपण करण्यात आले.
या प्रसंगी सौ. अनिशा पाटील पोलीस पाटील कांद्रेभुरे, सुनंदा एक माणुसकीची भिंतीचे अधिकारी, पदाधिकारी गावातील प्रतिष्ठित नागरिक होते
सदर कार्यक्रमात श्री भीमसेन गायकवाड साहेब सहा, पोलीस निरीक्षक केळवा सागरी पोलीस ठाणे यांच्या तर्फे लहान मुलांना शैक्षणिक वस्तू व खाऊचे वाटप करण्यात आले. श्री दिनेश ल गुडेकर अध्यक्ष, सुनंदा एक माणुसकीची भिंत. यांनी आलेल्या प्रमुख पाहुणे, गावकरी यांचे आभार मानुन, अशा प्रकारचे कार्यक्रम या पुढेही होतील असे मनोगत व्यक्त केले
No comments:
Post a Comment