*कोव्हीड मुक्तीच्या वाटेने आरोग्य विभागाचे मिशन "क्लीन अँड ग्रीन"*
पालघर (प्रतिनिधी)कोव्हिड १९ चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मागील २ महिन्यांमध्ये प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न केले.परंतु आता कोरोना महामारी पालघर जिल्ह्यातून समूळ नष्ट झाली पाहिजे या हेतूने जिल्हा परिषदेमार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दयानंद सूर्यवंशी यांनी सर्वांच्या सांधिक प्रयत्नांतून मिशन 'क्लीन अँड ग्रीन" ही मोहीम राबवण्यास सुरवात केली आहे. लवकरच पालघर जिल्हा कोव्हीड मुक्त करून "क्लीन अॅड ग्रीन" करणे हे या मोहिमेचे उद्दीष्ट असून त्यात आपण नक्कीच यशस्वी होऊ असा विश्वास डॉ.सूर्यवंशी यांनी व्यक्त केला आहे.
तालुका आरोग्य अधिकारी, सर्व वैद्यकीय अधिकारी, आशा, आरोग्य कर्मचारी यांना त्यांनी यासाठी आवाहन केले आहे.
आपल्या कार्यक्षेत्रामधील ज्या गावांमध्ये कोविड-१९ चा एकही रुग्ण आढळला नाही अशा गावांची केस स्टडी करुन त्यांनी अमलात आणलेल्या उपाययोजनांचा अभ्यास करावा.
सर्व गावांमध्ये (सद्यस्थितीत कोव्हीड रुग्ण असणारी व न असणारी अशा दोन्ही प्रकारची गावे)
सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझेशन आणि मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरण यांचा अवलंब होण्यासाठी मोठया प्रमाणावर जनजागृती करावी. यासाठी त्या त्या भागामध्ये सामाजिक प्रभाव
असणाऱ्या व्यक्ती उदा. धर्मगुरु सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था यांची मदत
घ्यावी. धार्मिक स्थळांकडून ध्वनीक्षेपकांद्वारे जनजागृती करावी. सुबा आणि किशोरवयीन मुले यांचे
सहकार्य घेऊन समाज माध्यमांद्वारे व्यापक अभियान राबविण्यात यावे.
कोविड सदृश्य लक्षणे असणाऱ्या सर्वांची तातडीने अॅन्टिजेन/ आरटीपीसीआर तपासणी करून
घ्यावी. सर्व रुग्णांचे ग्राम विलगीकरण अथवा कोविड केअर सेंटर येथे आवश्यकतेनुसार विलगीकरण
करावे, जरूर त्या तपासण्या आणि उपचार सुरु करावे.
घरी राहणारे रुग्ण अनेकदा कोव्हीड-१९ च्या
वाढत्या प्रार्दुभावास कारण ठरतात असे आढळून आले आहे. त्यामुळे गृह विलगीकरण टाळावे.
त्यासाठी स्थानिक ग्रामपंचायती, महसूल विभाग, पोलिस तसेच पदाधिकारी यांची आवश्यकतेनुसार मदत घ्यावी. ज्या रुग्णांची चाचणी सकारात्मक आली आहे. अशा रुग्णांच्या सर्व सहवासितांचा
तातडीने शोध घेऊन तपासणी करून घ्यावी व त्यांना विलग करावे.
सर्व कोविड १९ च्या बाधित रुग्णांना दररोज प्रत्यक्ष भेट आणि भ्रमणध्वनी/दूरध्वनी यांच्या
माध्यमातुन पाठपुरावा करण्यात यावा. त्यांची ६ मिनीटे वॉकिंग टेस्ट दर ६ तासांनी करावी, तसेच
वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांनुसार त्यांना उपचार तथा संदर्भ वा देण्यात यावी. या गोष्टी
नियमितपणे होण्यासाठी संबंधित वैद्यकिय अधिकारी यांनी शीघ्र प्रतिसाद पथके स्थापन करून त्यांच्या कामकाजाचा नियमित आढावा घ्यावा.
अशा प्रकारच्या सूचना या मोहिमेद्वारे देण्यात आल्या आहेत.
No comments:
Post a Comment