Sunday, June 13, 2021

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुंदन संखे यांनी केली वैद्यकीय मदत. आरोग्य अधिकाऱयांच्या हस्ते केक कापून साजरा केला वाढदिवस

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुंदन संखे यांनी केली वैद्यकीय मदत. आरोग्य अधिकाऱयांच्या हस्ते केक कापून साजरा केला वाढदिवस
-बोईसर (प्रतिनिधी)शिवसेना  नेते  आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुंदन संखे यांनी केली वैद्यकीय मदत.
आरोग्य अधिकारीयांच्या हस्ते केक कापून साजरा केला वाढदिवस
शिवसेनेचे युवा नेते  महाराष्ट्राचे पर्यावरण पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पालघर जिह्यात अविरत कार्य करण्याऱ्या  डॉक्टर,आरोग्य कर्मचारी, आशा सेविका यांनी केलेल्या मागणीनुसार शिवसेनेचे कुंदन संखे यांनी हॅन्डग्लोज, सैनिटायजर च्या स्वरूपात वैद्यकीय मदत आरोग्य अधिकारी डॉ . पांचाळ यांना सुपूर्द केली तसेच वैद्यकीय अधिकारी यांच्या हस्ते केक कापून आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कोरोनाच्या संघर्षात पालघर जिह्यात शिवसेनेचे कुंदन संखे यांनी विविध समाजघटकांना सर्वोतोपरी सातत्यपूर्ण सहकार्य केले असून आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आलेल्या या सहकार्याबाबत आरोग्य अधिकाऱयांनी  आभार व्यक्त केले.

No comments:

Post a Comment