*आमदार श्रीनिवास वनगा यांनी केली जिल्हा क्रीडा संकुल इमारतीमध्ये आयसोलेशन केंद्र उभारण्यांची केली मागणी*
*रुग्णांना मदतीसाठी हेल्पलाईन नंबर सुरू करण्याबाबत केली सूचना*
पालघर *(प्रतिनिधी)*
पालघर सह जिल्ह्यातील वाढती करोना रुग्णानची वाढती संख्या लक्षात घेऊन पालघर शहरातील तालुका व जिल्हा क्रीडा संकुल ताब्यात घेऊन तिथे ऑक्सिजन बेड सह अति दक्षता विभाग सुरू करावा तसेच नंडोरे आश्रमशाळा व अन्न धान्य वखार महामंडळ च्या इमारती सह इतर खाजगी इमारती व शाळा ताब्यात घेऊन तिथे करोना केयर सेंटर व ऑक्सिजन बेड सह व्यवस्था जलद गतीने करावी यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन यांची भेट घेऊन लेखी मागणी पत्र दिले तसेच रेमडिसिव्हीर इंजेक्शन व ऑक्सिजन बेड च्या तुटवड्या बाबत चर्चा केली व या गोष्टीचा साठा पालघर जिल्ह्यात जास्तीत जास्त मागणी
शासनाकडे करण्यात यावी अशी सूचना केली.यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही प्रशासनाच्या सोबत आहोत असे सांगितले.
कोविड चा वाढता प्रदुर्भाव लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात अशी ही मागणी केली.
जिल्ह्यातील करोना बाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना उपलब्ध बेड,ऑक्सिजन बेड, व रेमडिसिव्हीर इंजेक्शन यांची माहिती मिळावी यासाठी टोल फ्री रुग्ण हेल्पलाईन नंबर जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करावा जेणेकरून रुग्णाच्या नातेवाईकांना मदद होईलच त्याच बरोबर प्रशासकीय कामकाजात ही मदद होईल,व प्रशासनावरील भार कमी होईल अशी सूचना ही आमदार श्रीनिवास वनगा यांनी केली,
दरम्यान आपल्या आमदार निधीतून विविध कोविड साहित्य साठी आवश्यक मदद करू असे ही आमदार वनगा यांनी सांगितले.
यावेळी तहसीलदार श्री.चंद्रसेन पवार व शिवसेना पालघर शहर संघटक सुनील महेंद्रकर आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment