बोईसरला(अफाट गर्दी टाळण्यासाठी) लसीकरण केन्द्र वाढविण्याची शिवसेनेची मागणी
बोईसर ,(प्रतिनिधी)दि.27 एप्रिल 2021
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील हजारो कामगार व परिसरातील गावांत प्रचंड मोठया प्रमाणात असलेली लोकसंख्या पाहता सद्या तारापूर एमआयडीसी तील टीमा हॉल मधे सुरु असलेल्या लसिकरण केन्द्राची क्षमता अत्यंत कमी आहे त्यातच 1 मेपासून
18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरु
करण्यात येणार असल्याने अफाट गर्दी
उसळणार असल्याने बोईसर शहरात लसीकरण केंद्रे वाढविण्याची मागणी शिवसेनेचे विधानसभा संघटक निलम संखे यांनी केली आहे
संखे यांनी आज पालघरचे तहसीलदार , गटविकास अधिकारी व आरोग्य अधिकारी
यांची प्रत्यक्ष भेट घेवून निवेदन देवून वास्तवही सांगितले त्यांनी दिलेल्या निवेदनात सद्या 45 वर्षावरील नागरिकांची लसीकरणासाठी अफाट गर्दी होत असुन ती नियंत्रणा बाहेर जात आहे
त्या मुळे 1मेपासून या गर्दिच्या कीती तरी अधिक पट मोठीगर्दी वाढेल त्यामुळे शासकीय यंत्रणेवर ताण पडून मोठा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे हे सर्व लक्ष्यात घेऊन लसीकरण केंद्र वाढवण्यात यावे अशी मागणी केल्या नंतर
सर्वांनी सकारात्मक भूमिका घेवून लवकरात लवकर बोईसर मध्ये अजून नवीन लसीकरण केंद्र चालू करण्याचे आश्वासन दिल्याचे संखे यांनी सांगितले
No comments:
Post a Comment