ग्रामसेवालय उंबरपाडा-सफाळे कोव्हिड लसीकरण केंद्र
*आरोग्य विभागामार्फत सफाळे येथे होणाऱ्या विनामूल्य लसीकरणाबाबत सूचना*
सफाळे(प्रतिनिधी)सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की, *सफाळे-उंबरपाडा, माकणे व कर्दळ ग्रामपंचायतीतील कर्मचाऱ्यांना व निवडक ज्येष्ठ नागरिकांना प्रायोगिक तत्त्वावर उद्या मंगळवार दि. १६/०३/२०२१ रोजी सकाळी ९.३० वाजेपासून कोविड लस* देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर आठवड्यात *दर मंगळवार, गुरुवार व शनिवार रोजी प्रतिदिन 200 (सकाळी 100 व दुपारी 100)* याप्रमाणे *60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व वय वर्षे 45 ते 59 दरम्यान डायबेटिक (मधुमेह रुग्ण) यांचे रजिस्ट्रेशन करून विनामूल्य लसीकरण* केले जाणार आहे. तरी, कृपया *लसीकरण करू इच्छिणाऱ्या पंचक्रोशीतील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी गर्दी न करता सकाळी 9.00 ते 1.00 व दुपारी 2.00 ते 5.00* या वेळेत उपस्थित राहावे. *गर्दी टाळण्यासाठी लसीकरणापूर्वी "ग्रामसेवालय उंबरपाडा-सफाळे कार्यालय" या ठिकाणी आगाऊ नोंदणी करून टोकन नंबर घेणे बंधनकारक राहील.*
*टीप :- सोबत येताना आधारकार्ड आणणे बंधनकारक आहे.*
*- उंबरपाडा सफाळे, माकणे व कर्दळ ग्रुप ग्रामपंचायतीच्या सौजन्याने*
No comments:
Post a Comment