Friday, March 26, 2021

पालघर जिल्ह्यात २०%, ४०%अनुदानास पात्र शाळांच्या आदेशांचे वाटप जि. प. अध्यक्षा सौ भारतीताई कामडी यांच्या हस्ते वाटप

*पालघर जिल्ह्यात २०%, ४०%अनुदानास पात्र शाळांच्या आदेशांचे वाटप जि. प. अध्यक्षा सौ भारतीताई कामडी यांच्या हस्ते वाटप*
पालघर (प्रतिनिधी)महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय दि.१२/०३/२०२१नुसार पालघर जिल्ह्यातील एकूण २६ शाळा व ५वर्ग तुकड्या वाढीव २०% म्हणजे ४०% अनुदानासाठी टप्पा अनुदानावर तसेच ३शाळा व २ वर्ग तुकड्या २०%अनुदानास पात्र घोषित झाल्या आहेत.या मुळे पालघर जिल्यात १० ते १५वर्षापासून प्रतीक्षेतअसणारे खाजगी अनुदानित २७२ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या वेतनास पात्र ठरले आहेत त्या शाळांच्या अनुदानाचे आदेश दि२६/०३/२०२१ रोजी जि.प. अध्यक्षांच्या दालनात  अध्यक्षा तथा शिक्षण सभापती *मा सौ. भारतीताई कामडी*, 
बांधकाम सभापती *मा. श्री. काशिनाथजी चौधरी*, 
जि. प. सदस्य *मा. श्री.प्रकशजी निकम*,
शिक्षणाधिकारी(माध्य) *मा.सौ. संगीता भागवत* 
यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या वेळी 
उपशिक्षणाधिकारी *मा श्री नरेश पाटील*, 
उपाध्यक्ष शिक्षक सेना पालघर जिल्हा *मा.श्री.रविंद्र नाईक* 
व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
अनुदान मिळण्यासाठी अध्यक्षा मा सौ. भारतीताई कामडी यांचे मार्गदर्शन, शिक्षणाधिकारी मा. सौ. संगिता भागवत,उप शिक्षणाधिकारी मा. श्री. नरेश पाटील मा. श्री. कासले यांचे विशेष प्रयत्न व सर्व कर्मचारी यांचे सहकार्य मोलाचे ठरले
सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, सर्व संघटना यांनी या सर्वांचे आभार मानून  आनंद व्यक्त केला
२७२ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना १नोव्हेंबर २०२०पासून या वेतनाचे लाभ मिळणार आहेत

No comments:

Post a Comment