Friday, March 19, 2021

मोफत वाचनालय उद्घाटन तांदुळवाडी ( नाका ) डोंगरीपाडा.

मोफत वाचनालय उद्घाटन 
  तांदुळवाडी ( नाका ) डोंगरीपाडा. 
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) दिनांक १३ मार्च २०२१ रोजी सुनंदा चॅरिटेबल अॅन्ड एज्युकेशनल ट्रस्ट ( रजि.) व्दारा सुनंदा एक माणुसकीची भिंत पुरस्कृत, कै. अनंत दाजी वझे मोफत वाचनालय, तांदुळवाडी नाका. डोंगरीपाडा. ग्रामपंचायत तांदुळवाडी ता,जि पालघर येथे मा. श्री संदिप कहाळे - सहाय्यक पोलिस निरीक्षक सफाळे पोलीस स्टेशन यांच्या हस्ते मोफत वाचनालयाचा उद्घाटन सोहळा पार पाडण्यात आला.  या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री रमेश चावरे सरपंच तांदुळवाडी ग्रामपंचायत, श्री जगदीश किणी सर - समाजसेवक, श्री इंद्रमेल जैन व्यापारी सफाळे, श्री योगिराज वझे समाजसेवक, श्री एकनाथ किणी  समाजसेवक तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, गावकरी मोठ्या समुहाने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment