Tuesday, March 30, 2021

सफाळे ग्रामपंचायत हद्दीत पाणी टंचाई !

सफाळे ग्रामपंचायत हद्दीत पाणी टंचाई ! 
अर्चना पाटील - भाजपा महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस 
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) सफाळे विभागात मुबलक पाणी साठा असून सुध्दा, सफाळे ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल चालू असल्याचे दिसून येत आहे. पाणीपुरवठा करणार्‍या योजनेचा करोडो रूपयांचा प्लांट बंद पडुन आहे, परंतु १० रुपयात शुध्द जलपेय जागेवर विकत मिळते. तर त्यांची घरपोच किंमत २०रुपये घेतली जाते. शुध्द जलपेय, लाईट, रस्ते ही ग्रामपंचायतीची जबाबदारी असताना सतरा गांव पाणीपुरवठा  योजना ठप्प आहे. यामुळे गरिब जनतेला विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे. यावर कायम स्वरूपात तोडगा निघायला हवा. अश्या प्रकारची मागणी असलेले निवेदन ग्रामपंचायत सफाळे पोस्ट उंबरपाडा ता,जि पालघर यांना अर्चना पाटील  यांनी भाजपा जिल्हा पदाधिकारी सौ अंजली कुडू भरत काळे यांच्या उपस्थित दिले असून लवकरात लवकर पाणी प्रश्न सुटला नाहीतर, जन आंदोलनाचा इशाराही दिला आहे. 
           सफाळे ग्रामपंचायत यांच्या कडे वरील विषयावर विचारले असताना १७ रा गांव पाणी पुरवठा योजनेचे म.रा.वि.चे बिल थकित असल्याने पाणी पुरवठा बंद आहे. परंतु सफाळे ग्रामपंचायत लवकरच आपले विलंगीकरण करून सफाळे कराना स्वंतत्र पाणी पुरवठा योजना सुरू करीत आहे. पाणी पुरवठा करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी सदैव तत्पर असून ते प्रत्येक विभागात जाऊन पाणी पाहणी करीत असतात.

No comments:

Post a Comment