*जागतिक जलदिनानिमित्त जिल्ह्यात पाणी संवर्धन व बचत करण्याच्या जनजागृती सप्ताहास सुरुवात*
पालघर (प्रतिनिधी)प्रत्येक जीवनासाठी पाणी हा महत्त्वाचा नैसर्गिक स्त्रोत आहे.या पाण्याचे महत्त्व अधोरेखीत करुन त्याचा सर्वकाळ उपलब्धता , सुरक्षितता आणि शाश्वत वापरासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी जागतिक जल दिनाचे औचित्य साधुन सोमवार दि.२२ मार्च २०२१ रोजीपासुन जिल्ह्यात दि.२२ मार्च ते दि.२७ मार्च २०२१ या कालावधीत जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली.
याबाबत जागतिक जल दिन दिनांक 22 मार्च 2021 निमित्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा. सिद्धाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद पालघर मधील सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी, पाणी बचतीबाबत जल शपथ घेतली. याप्रसंगी सर्व विभागांचे विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.दरवर्षी २२ मार्च हा दिवस जागतिक जलदिन म्हणून सर्वत्र साजरा होतो.त्या अनुषंगाने पाण्याचे महत्व लक्षात घेऊन ते सर्वकाळ उपलब्धतेसाठी आणि शाश्वत वापरासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृतीपर असे विविध उपक्रम आयोजित करणे अपेक्षित आहे.या पार्श्वभूमीवर जागतिक जल दिनाच्या निमित्ताने पाण्याचे महत्व, पाणी पुरवठ्यासाठी वापरात येणारे जलस्रोत यांचे संवर्धन, संरक्षण आणि जुन्या नादुरुस्त जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, तसेच मोठ्या प्रमाणावर होणारी योजनांमधील पाणी गळती थांबविणे गरजेचे आहे. ग्रामीण जनतेला शुद्ध, पुरेसे आणि शाश्वत पाणी उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन कक्ष व ग्रामीण पुरवठा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पाणी शुद्धता , पाणी वाचवा , पाणी सुरक्षितता आदीबाबत विविध उपक्रम जिल्ह्यातील सर्व तालुक्यात गट विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत स्तरावर दि.२२ मार्च ते २७ मार्च २०२१ दरम्यान आयोजित करण्यात आले आहेत. या सप्ताहांर्तगत २२ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील जिल्हा,तालुका व ग्रामपंचायत स्तरावर जलप्रतिज्ञा घेऊन जलसप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला यानिमित्ताने .''जुनं ते सोनं जल स्त्रोतांचे पुनरुज्जीवन आणि बळकटीकरण स्पर्धा,
स्त्रोत व साठवण टाकी जलकुंभ साफ -सफाई सप्ताह,
पाणी वाचवा- पाणी वाचवण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत जागतिक जल दिनाचे महत्त्व सांगून त्यांना आवाहन करणे, शुन्य गळती मोहीम,
जल जीवन मिशन लोगो स्पर्धा, पाण्यावरील लोक गीतं, पोस्टर, रांगोळी स्पर्धा, जलसाक्षरता या विषयावर नाटिका, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा उपक्रमासह
२३ मार्च रोजी ग्रामपंचायत , शाळा , अगणवाडी स्तरावर शुद्ध पाण्याचे महत्त्व समजावून सांगणे आणि सप्ताहाची व्यापकता पटवून देणे , २४ मार्च रोजी पाणी जपून वापरण्याची आवश्यकता व पद्धती डिजीटल माध्यमांचा वापर करुन समजावून सांगणे , २५ मार्च रोजी पिण्याचे पाणी तपासणीमध्ये दुषित आलेल्या स्त्रोतांचे उपाययोजना व दुरुस्तीबाबत माहिती देणे , २६ मार्च रोजी पाणी शुद्धीकरण कार्यपद्धती व टीसीएल वापर याबद्दल व २७ मार्च रोजी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत व साठवण टाकीची स्वच्छता करणे , शुन्य गळती मोहिम , नादुरुस्त स्त्रोत दुरुस्त करणे आदी उपक्रम राबविले जाणार आहेत.
दरम्यान सदरचे उपक्रम राबविताना कोरोना प्रतिबंधक नियमावलीच्या उपाययोजनेबाबत केलेल्या नियमांचे पालन होईल याची दक्षता घ्यावी असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता ) प्रवीण भावसार यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment