Sunday, February 14, 2021

जिल्हा परिषद शाळा वेवूर विद्यार्थीना सलाम

जिल्हा परिषद शाळा वेवूर विद्यार्थीना सलाम !
पालघर ( हिरालाल लोखंडे )  शासनाने डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम स्पेस रिसर्च यांच्या वतीने पेरोडा क्युब चॅलेंज हा उपक्रम राबविण्यात आलेला. या उपक्रमात महाराष्ट्र राज्यातील ३८०विद्यार्थी सहभागी झालेले, एकाचवेळी १०० उपग्रह सोडणे, या उपक्रमाची नोंद जागतीक कीर्तीच्या गिनीज बुकात घेण्यात आलेली आहे. सदर या उपक्रमात जिल्हा परिषद शाळा वेवूर ता,जि, पालघर येथील ६ विद्यार्थी यांनी सहभाग घेतलेला. त्याना मार्गदर्शन करणारे शिक्षक, यांच्या यशस्वी योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने गुणवंत असे ६ विद्यार्थी व त्यांना प्रशिक्षण देणारे श्री अजित दळवी सर ( गुरूजी ) यांना शाल, श्रीफळ,व सन्मान पत्र देऊन श्री सुहास राऊत - जिल्हा परिषद शिक्षक संघटना अध्यक्ष  श्री महेश जाधव - कार्याध्यक्ष, श्री  संतोष संखे - कार्यवाह,श्री प्रकाश भोईर जिल्हा उपाध्यक्ष, श्री हरेश वैद्य समन्वय समिती सदस्य, आदी मान्यवर, श्रीमती कांचना पाटील मुख्याध्यापिका जि. प.शाळा वेवूर, तसेच पूनम संखे, प्रतिक्षा संखे शिक्षक वर्ग, कर्मचारी कार्यक्रमात सहभागी झालेले. उपस्थित शिक्षकांनी संघटनेचे आभार मानले.

No comments:

Post a Comment