Wednesday, February 24, 2021

सामुदायिक विवाह सोहळे, ५० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेले कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई आदेश

सामुदायिक विवाह सोहळे, ५० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेले कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई आदेश                                     पालघर(प्रतिनिधी) दि २४ : कोरोना विषाणूचा (कोकिड-१९) चा प्रार्दुभाव व संसर्ग  रोखण्याकरीता सामुदायिक विवाह सोहळे ,  ५० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेले कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.

आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व उपोद्घातातील अ.क्र.३ मधील शासन अधिसुचनेतील निर्देशानुसार पालघर जिल्हयाच्या कार्यक्षेत्रात कोव्हिड १९ बर नियंत्रण आणण्यासाठी तसेच  प्रादुर्भाव रोखण्यासाठी  जिल्लयामध्ये (वसई विरार महानगर पालिका क्षेत्र वगळून) सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करण्यास पुढील आदेश होईपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.
       सार्वजनिक कार्यक्रम, हळदी कार्यक्रम ,विवाह कार्यक्रम या सारख्या कार्यक्रमांकरिता मंगल कार्यालय, रिसॉर्ट भाडयाने दिली जातात. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने शासनाच्या उपोद्घातातील अ.क्र.४ आदेशानुसार ५० लोकांच्या मर्यादेत  कार्यक्रमास संबंधित तहसीलदार यांच्याकडून परवानगी दिली जाते. परतू अशा कार्यक्रमाच्या ठिकाणी अचानक भेटी दिल्या असता, परवानगी न घेतलेल्या किंवा ५० लोकांपेक्षा जास्त लोक उपस्थित असलेल्या  मंगल कार्यालय , रिसॉर्ट  मालकांविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे..                          सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन

अधिनियम २००५ मधील ५१ (b), भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ व भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) च्या कलम १८८ नुसार दंडनिय कायदेशीर कारवाईस पात्र असणार आहे.

No comments:

Post a Comment