Saturday, February 13, 2021

रेशन दुकानातून धान्याची अनाधिकृत विक्री ?

रेशन दुकानातून धान्याची अनाधिकृत विक्री ?
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) दातिवरे ता,जि पालघर येथील रास्त भाव धान्य दुकान नंबर येथून दुकानातील धान्याची अनधिकृत विक्री ( जास्त पैसे घेऊन ) होत असल्याची माहिती गावकर्‍यांना मिळाल्यानंतर सदर बाबींचा शोध घेत असताना शनिवार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे १२-३० ते १ वाजेच्या दरम्यान एक इसम मोटारसायकलवर रेशन दुकानातून धान्याची भरलेली गोणी नेत असताना  गावकर्‍यांनी विचारणा केली असता भरलेल्या गव्हाची गोण ग्रामपंचायत दातिवरे पटांगणात टाकुन निघून गेला. गांवक-यांनी सदर घटने बद्दल पुरवठा अधिकारी यांच्याशी संपर्क साधला गव्हच्या गोणी बद्दल माहिती दिला असून, सागरी पोलिस स्टेशन अधिकर प्रभारी गायकवाड साहेब यांना कळविले,  असता साहेब स्वतः जागेवर जाऊन पाहणी केली,असता पुरवठा अधिकारी पुढील कारवाई करतील असे सांगतात गावकर्‍यांना सांगितले. 
    पोलिस  कर्मचारी व पुरवठा विभागातील अधिकारी घटना स्थळी पोहचले असून पुढील कारवाई सूरू आहे

No comments:

Post a Comment