आपले सरकार सेवा केंद्रा अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा
पालघर (प्रतिनिधी)ग्रामपंचायत मधील आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत केंद्र चालकांच्या मदतीने ग्रामपंचायत मधील कामकाज सुरळीत चालावे आणि गावातील नागरीकांना सर्व सुविधा गाव पातळीवर मिळाव्यात असे शासनाचे धोरण आहे परंतु सद्यस्थितीत पालघर जिल्ह्यात बऱ्याच कालावधीपासून केंद्रचालकांना महाऑनलाईन (MOL) चे प्रशिक्षणा अभावी गावातील नागरीकापर्यंत सुविधा पोहचण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यासाठी दिनांक -३० जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता पंचायत समिती सभागृह पालघर येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रवीण प्रशिक्षक महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत हे प्रशिक्षण देण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या प्रमुख उपस्थितीत हे प्रशिक्षण पार पडले. यावेळी गट विकास अधिकारी वसई, तलासरी, डहाणू, उपस्थित होते. सदर प्रशिक्षणास प्रत्येक तालुक्यातील विस्तार अधिकारी (पचायत), संगणकीय ज्ञान असणारे, दोन ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी, तालुका समन्वयक, तांत्रिक सहहायक आणि दोन केंद्रचालक याना प्रशिक्षण देण्यात आले.
No comments:
Post a Comment