अपूर्ण रोस्टर - पदोन्नती थांबली - शिक्षकांवर अन्याय ?
पालघर ( हिरालाल लोखंडे ) -- दिनांक २८ जानेवारी २०२१ रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षणसेना व मा. खासदार राजेंद्र गावित साहेब यांच्या बरोबर पालघर जिल्ह्यातील जिल्हापरीषद शाळांमधील प्रलंबित समस्या संदर्भात बैठक आयोजित केलेली. यामधे शिक्षकांच्या पदोन्नती - वरीष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी रखडलेले प्रस्ताव, पदवीधर शिक्षक वेतनश्रेणी, वैद्यकीय बिले, प्रशिक्षित शिक्षकांना वेतनश्रेणी, डी सी पी सी ( DPCP )धारकाच्या कपातीसह हिशोब, जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया, शाळांची इंटरनेट जोडणी, वीजबिल भरणा, करोना उपाययोजना, शिक्षक गुणगौरव आदी समस्या विषयी शिक्षक सेना व शिक्षणविभागाचे अधिकारी.मा, खासदार साहेब यांच्या बरोबर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली.
या बैठकीस श्री केदार काळे - शिवसेना पालघर लोकसभा सहसमन्वयक, श्री जयेंद्र दुबळा - शिवसेना गटनेते जिल्हा परिषद, श्री एस एम जनाटे - जी.परिषद विस्तार विस्तार अधिकारी, श्री दीपक पिंपळे - गट शिक्षणाधिकारी, श्री संजय पाटील - शिक्षक सेना जिल्हा अध्यक्ष, शिक्षण खात्यातील सौ तांडेल, श्री पी.के, चौधरी, माध्यमिक विभागाचे श्री बी. एस. कासले, वाय. बी. शिवगण तसेच शिक्षक सेनेचे अरुण भोईर, राकेश संखे, रवींद्र नाईक, निलेश सावे, भूषण ठाकूर, दिनेश खिलारे, जितेंद्र वडे, मनेश पाटील, प्रदीप पाटील, सौ रोशनी गावड. इत्यादी शिक्षक गण उपस्थित होते.
सहा वर्षाचे रोस्टर अपुर्ण असल्यामुळे शिक्षकांची पदोन्नती थांबवली आहे हा शिक्षकांवर अन्याय आहे. येत्या १५ फेब्रुवारी रोजी मी स्वतः सी,इ,ओ, ( C, E, O,) यांची मिटींग घेऊन आपल्या ( शिक्षकवर्गांच्या ) वरील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार.तसेच धोरणात्मक निर्णयासाठी व बदली होण्यापूर्वी पदोन्नती पुर्ण करणे, चटोपाध्याय आयोगाच्या,निवडसमितीच्या शिफारसी स्विकारण्यात साठी राज्यसरकारकडे पाठपुरावा करेन असे मा. गावीत साहेबांनी बैठकीत सांगितले.
No comments:
Post a Comment