Sunday, January 31, 2021

राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेत पालघरला पुरुष सांघिक गटाचे कांस्यपदक, नाशिक पुरुष प्रथम तर सातारा दुसऱ्या स्थानी.

राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेत पालघरला पुरुष सांघिक गटाचे कांस्यपदक, 
नाशिक पुरुष प्रथम तर सातारा दुसऱ्या स्थानी.

पालघर  दिनांक 31/1/2021 बाबासाहेब गुंजाळ

दिनांक ३१ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता पुणे फुलगांव येथे  सुभाष चंद्र मिलिटरी स्कूल मैदानात    झालेल्या राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेत पालघर जिल्ह्याच्या खेळाडूंनी भाग घेतला. कोरोना संकटानंतर पहिलीच क्रॉसकंट्री स्पर्धा असल्याने याच स्पर्धेकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागलेलं होतं. पालघर जिल्ह्याच्या पुरुष, महिला, 20 वर्षाखालील मुले, मुली. 18 वर्षाखालील मुले, मुली व 16 वर्षाखालील मुले, मुली असे एकंदरीत बत्तीस खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते.
१० किलोमीटर अंतराच्या पुरुष गटातील क्रॉस कंट्री स्पर्धेत पालघर जिल्ह्याच्या पुरुषांचा संघ कांस्य पदकाचा मानकरी ठरला. पुरुष गटात नाशिक ने आपला दबदबा कायम राखत प्रथम क्रमांक पटकावला तर सातारा संघ द्वितीय स्थानी राहिला.            पालघर जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनच्या प्रयत्नांना हळू येत असून ग्रामीण भागातले खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये आपापली नावं चमकवत असल्याचे हे उत्तम उदाहरण आहे.शैलेश गांगोडा, अमित माळी,विशाल वळवी,ज्ञानेश्वर मोरागा, या खेळाडूंनी पहिल्यांदाच पालघर जिल्ह्याला क्रॉस कंट्री स्पर्धेत तिसऱ्या पारितोषिक मिळवून दिलं.
सदर पालघर जिल्हा क्रॉसकंट्री संघाला डॉ. रवींद्र वाल्मिकी स्प्रिंटर स्पोर्ट्स क्लब वसई यांच्याकडून टी-शर्ट पुरस्कृत करण्यात आले होते त्यांचे पालघर जिल्ह्यातील ॲथलेटिक्स असोसिअशन चे सचिव राकेश सावे यांनी आभार मानत विजयी खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

बॉक्स
शैलेश गांगोडा:-  हा खेळाडू डहाणू मधील असून गेली अनेक दिवस परिस्थिती झटत सध्या डहाणू येथे वनपाल म्हणून वनविभागात काम करत आहे.

अमित माळी :
अमित माळी विक्रमगड चा खेळाडू असून परिस्थितीशी झगडत आखाडे सराव करतो आहे वनवासी कल्याण च्या माध्यमातून तो सराव करत इथवर पोचला आहे.


विशाल वळवी
: हा खेळाडू जव्हार सारख्या ग्रामीण भागातील आहे,घराची परिस्थिती हलाखीची आहे तरी त्याची जिद्द मोठी आहे.


ज्ञानेश्वर मोरघा:
 हा विक्रमगड चा खेळाडू असून परिस्थितीशी झगडत सराव करत असून वनवासी कल्याण आश्रम यांच्या माध्यमातून तो सराव करतो ज्ञानेश्वर ने याअगोदर मॅरेथॉन स्पर्धेत चांगले यश मिळवले असून नोकरीच्या शोधात तो आहे,

No comments:

Post a Comment