Saturday, January 2, 2021

वाळकेश्वर ते गेटवे ऑफ इंडिया तीन तासात पार -आंतरराष्ट्रीय जलतरणपटू शुभम वनमाळीचा आणखी मनाचा तुरावेध

वाळकेश्वर ते गेटवे ऑफ इंडिया तीन तासात पार -आंतरराष्ट्रीय जलतरणपटू शुभम वनमाळीचा आणखी मनाचा तुरा

वेध ताज्या घडामोडींचा:

दि.२/नवीमुंबई प्रतिनिधी:
नवीमुंबईतील शुभम धनंजय वनमाळी आंतरराष्ट्रीय ओपन वॉटर जलतरणपटू आणि शिवछत्रपती अवॉर्ड विजेता यांनी आपल्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला.

राजभवन (गव्हर्नर बंगला), वाळकेश्वर ते गेटवे ऑफ इंडिया 1. हे पंधरा किलोमीटरचे अंतर तीन तास तेरा मिनिटांमध्ये दिनांक ३० डिसेंबर २०२०रोजी पोहून पार केले. मार्च महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत कोवीड-१९ या महामारीमुळे सर्व जलतरणतलाव बंद असल्यामुळे या काळामध्ये कोणत्याही प्रकारचा सराव होऊ शकला नव्हता. परंतु मागील फक्त २० ते २५ दिवस सराव करून हे शिवधनुष्य त्याने पेललं. या स्विमची सुरुवात सायंकाळी ०३.५६ ला केली आणि सांगता ०७.०९ ला केली. या स्विमच्या निरीक्षक म्हणून महाराष्ट्र स्विमिंग असोसिएशनने आंतरराष्ट्रीय ओपन वॉटर जलतरणपटू रूपाली रेपाळे यांची नेमणूक केली होती.

शुभमने यापूर्वी जगभरातील सुप्रसिद्ध इंग्लिश खाडी, जिब्राल्टरची सामुद्रधुनी यासारख्या अनेक खाड्या पोहून पार केलेल्या आहेत. तसेच अनेक जागतिक तसेच आशियाई विक्रम त्याच्या न

No comments:

Post a Comment