Thursday, January 14, 2021

करोना रूपी संक्रांत जाऊ दे ! सफाळावासी महिलांचे देवीला साकडे

करोना रूपी संक्रांत जाऊ दे ! सफाळावासी महिलांचे देवीला साकडे !
सफाळे ( हिरालाल लोखंडे)  कोरोना महामारीचे जग भरात सावट असतानाही, सफाळे येथे मकरसंक्रांतीचा सण मोठ्या उत्साहाने सालबाद प्रमाणे या वर्षी सुध्दा सफाळ्यातील शिक्षक कुटुंबातील महिलांनी सफाळे गावदेवी कुर्लाई मातेला सुवासनिचा वाण अर्पण करून मकरसंक्रांत साजरी केली. या प्रसंगी उपस्थित सुहासिनी महिलांनी " कोरोना रुपी संक्रांत जाऊ दे, सर्व जगातील लोकांना चांगले आरोग्य लाभू दे व नूतन वर्षात सर्वाच्या जीवनात गोडी - गुलाबा, सद्भावना राहुन संकटे टळू दे, असे साकडे देवीला घालण्यात आले. 
   सफाळे परीसरात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व अन्य भागातील   अनेक शिक्षक कुटुंबीय वास्तव्य करीत आहे, सुमारे दीड दशका पासून शिक्षक कुटुंबातील महिला कुर्लाई मातेच्या ( देवीच्या ) मंदिरात एकत्र येऊन त्यांच्या प्रथा --परंपरा -- रूढी -- चालीरीती प्रमाणे मकरसंक्रांतीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. परंपरे प्रमाणे एकमेकींना सुवासनिचे वाण देतात. तिळगूळ देऊन देवीकडे सुखी संसाराचे मागणं करतात.

No comments:

Post a Comment