*प्रतिंबधित क्षेत्रात दि.३१ डिसेंबर पर्यंत निर्बंध*
पालघर (प्रतिनिधी)दि. 02 :- राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोविड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13 मार्च, 2020 पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. सदर अधिसूचनेनुसार .
आपत्कालीन उपाययोजनांचा भाग म्हणून केंद्र व राज्य शासनाने नागरिकांची गर्दी होऊ नये आणि परस्पर संपर्क वाढून विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी संपूर्ण राज्यभरात वेळोवेळी लॉकडाऊन उद्घोषणेद्वारे मार्गदर्शक सूचना आदेश लागू केले आहेत. तसेच सदरच्या लॉकडाऊन आदेशांना वेळोवेळी मुदतवाढ दिलेली आहे. त्यानुसार प्रतिबंधित क्षेत्रा (Containment Zone) बाहेरील क्षेत्रात विशिष्ट बार्बींना टप्याटप्याने सवलती घोषित (Easing of Restrictions and Phase-wise opeing of Lockdown) करण्यात आल्या आहेत.
केंद्र शासन व राज्य शासन यांचेकडील उपोदूघातातील अ.क्र. ७ व ८ च्या आदेशान्वये प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zone) वगळता उर्वरित क्षेत्रात विशिष्ट बाबींना वाढीव सवलती (Easing of Restrictions and Phase-wise opeing of Lockdown) देण्यात आलेल्या आहेत. तसेच प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zone) अस्तित्वात असलेल्या क्षेत्रात अत्यावश्यक बाबी वगळता टाळेबंदी (Lockdown) आदेशांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पालघर जिल्हयात (वसई विरार महानगरपालिका क्षेत्र वगळून) प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zone) अस्तित्वात असलेल्या व नव्याने प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zone) अस्तित्वात येतील त्या क्षेत्रात दि.३१/१२/२०२० रोजी मध्यरात्रीपर्यंत Lockdown चे निर्बंध पूर्ववत स्वरूपात चालू ठेवण्यात येत आहेत. सदरच्या क्षेत्रामध्ये अत्यावश्यक बाबी, तातडीच्या वैद्यकीय सेवा व शासकीय कामकाज या व्यतिरिक्त सर्व बाबींवर प्रतिबंध लागू राहतील. प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zone) च्या बाहेरील क्षेत्रासाठी राज्य शासनाचे मिशन बिगिन अगेन आदेश दि.३१/१२/२०२० नुसार वाढीव सवलती (Easing of Restrictions and Phase- opeing of Lockdown) लागू राहतील. त्याबाबतची काटेकोर अंमलबजावणी जिल्हयातील संबंधित नगर परिषद , नगर पंचायत व ग्रामपंचायत यांनी करावयाची आहे.
महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आयुक्त महानगरपालिका यांनी वेळोवेळी घोषित केले लॉकडाऊनचे आदेश लागू राहतील.
वरील आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येणार असुन. सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ५१ ते ६०, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ व भारतीय दंड. संहिता (४५ ऑफ १८६०) च्या कलम १८८ नुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र राहील.
No comments:
Post a Comment