Monday, December 14, 2020

राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा श्री शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर संपन्न

राष्ट्रवादी पक्षाचे  सर्वेसर्वा  श्री शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर संपन्न
पालघर ( हिरारालाल लोखंडे)राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण देशाच्या समाजकारणात सक्रिय असणारे भारदस्त व्यक्तिमत्व मा. ना. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांच्याद्वारे जनसेवेचे विविध उपक्रम हाती घेण्यात आले होते. जिजाऊ संस्थेतर्फे आयोजित महारक्तदान शिबिराला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने माणुसकीची साक्षच जणू याप्रसंगी मिळाली. 
जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती, पालघर आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक तथा अध्यक्ष मा. श्री. निलेशजी सांबरेंच्या मार्गदर्शनाखाली जनकल्याणाच्या व्यापक असा उपक्रम अगदी यशस्वीरीत्या पार पडला. कोरोनासारख्या महाभयंकर रोगाने संपूर्ण राष्ट्रात थैमान घातले आणि कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच गेली. अशा प्रसंगी रुग्णालयांमध्ये रक्तपुरवठ्याची गरज अधिकच भासू लागली. अशा अगदी निकडीच्या क्षणी जिजाऊ संस्थेने ठाणे-पालघर जिल्ह्यात वाडा (पाली), विक्रमगड, जव्हार (साकुर), मोखाडा, तलासरी, डहाणू (निंबापूर महालेपाडा), तलासरी, पालघर (मनोर), कल्याण (खडवली), भिवंडी (पाच्छापूर), शहापूर (गोठेघर), मुरबाड (म्हसा), भिवंडी (पिसे), भिवंडी व भिवंडी शहर (टेमघर, अन्सार मोहल्ला) अशा एकूण १४ ठिकाणी महारक्तदान शिबीर आयोजित केले. 
मा. श्री. निलेशजी भगवान सांबरे यांच्या जनसेवेचे हाकेला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि एकूण ११२ रक्तदान शिबिरांमध्ये रक्तदानासाठी लोकांची जणू रांगच लागली. ठाण्यामध्ये एकूण २९४ रक्तदात्यांनी तर पालघरमध्ये एकूण ४९९ रक्तदात्यांनी ब्लड डोनेट करत या समाजकार्यामध्ये सहभाग घेतला. या व्यापक अशा उपक्रमाच्या मदतीने एकूण ७०१९ बॅग रक्तसंकलन करण्यास जिजाऊ संस्थेला यश मिळाले, ज्याचा फायदा आता हजारो गरजू रुग्णांना होईल. मा. श्री. निलेशजी भगवान सांबरे यांनी या सत्कार्यात हातभार लावण्यासाठी तरुणाईला आवाहन केले होते आणि युवकांनी आवर्जून रक्तदानाला हजेरी लावत हा उपक्रम सार्थ ठरविला. 

अशा विस्तृत उपक्रमासारखेच अनेक जनसेवेचे उपक्रम नागरिकांसाठी राबवून त्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी जिजाऊ संस्था भविष्यातही अविरतपणे कार्य करीत राहील असे प्रतिपादन मा. श्री. निलेशजी भगवान सांबरे यांनी याप्रसंगी बोलताना केले.

No comments:

Post a Comment