*जागतिक शौचालय दिनानिमित्त ग्रामीण भागात शाश्वत स्वच्छता राखण्यासाठी विशेष अभियान*
पालघर (प्रतिनिधी) ग्रामीण भागातील जीवनमानाचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने, वैयक्तिक स्वच्छता, वैयक्तिक शौचालय, शाळा, अंगणवाडीमध्ये शौचालयाची सुविधा , घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन , सार्वजनिक शौचालयांची योग्य देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक आहे. या बाबींचा विचार करून जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) अंतर्गत दि. १९ नोव्हेबंर या जागतिक शौचालय दिनानिमित्ताने दि. १७ नोव्हेंबर २०२०ते २७ नोव्हेबर २०२० या कालावधीत विशेष विशेष अभियान राबविले जाणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता विभाग) तुषार माळी यांनी दिली.
जिल्ह्यात हागणदारी मुक्त झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छतेचे सातत्य कायमराखण्यासाठी तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालयांची उपलब्धता या अनुषंगाने स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा २ ची सुरूवात झाली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सदर अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून दि. १९ नोव्हेंबर रोजी या जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून वैयक्तिक, सार्वजनिक,शाळा अंगणवाडी शौचालय संदर्भात दि. १७ नोव्हेबर २०२० ते दि.२७ नोव्हेंबर २०२० या कालावधीत विशेष अभियान राबविले जाणार आहे. या अभियान कालावधीत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये सार्वजनिक, वैयक्तिक, शाळा व अंगणवाडी शौचालय बांधकाम करणे, निधी वितरण , देखभाल दुरूस्ती तसेच स्वच्छतेमधील सातत्य याबाबत गृहभेटी देऊन जनजागृती केली जाणार आहे. यामध्ये सार्वजनिक शौचालयामध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करणे, वीज जोडणी करणे ,परिसर स्वच्छता, कूटूंबस्तर शौचालय परिसर स्वच्छता, वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम करून अनुदान वाटप करणे करणे, वैयक्तिक व सार्वजनिक नादुररूस्त शौचालयांची दुरूस्ती करणे आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील शाश्वत स्वच्छता कायम ठेवण्यासाठी सर्व ग्रामपंचायतीनी उत्स्फूर्त सहभाग घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. इपक्रम राबवितांना कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाबाबत आरोग्य विभागाने दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करून अभियान यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेने केले आहे.
•जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये सार्वजनिक, वैयक्तिक शाळा व अंगणवाडी शौचालय बांधकाम करणे
• वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांची देखभाल दुरूस्ती करणे
• स्वच्छतेमधील सातत्य याबाबत गृहभेटी देवून जनजागृती करणे.
• सार्वजनिक शौचालयामध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे .
• सार्वजनिक शौचालयामध्ये वीज जोडणी उपलब्ध करून देणे.
• सार्वजनिक शौचालय परिसर स्वच्छता, कुटूंबस्तर शौचालय परिसर स्वच्छता आणि सुशोभिकरण
• नादुरूस्त सार्वजनिक शौचालय, शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालयातील नादुरूस्त शौचालयांची दुरूस्ती
• वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम व प्रोत्साहन अनुदान वाटप करणे
इ विशेष उपक्रम जागतिक शौचालय दिनानिमित्त विशेष अभियानामध्ये राबविले जाणार आहेत.
No comments:
Post a Comment