नाशिक त्रंबकेश्वर येथील त्र्यंबक राजाचे देवस्थान सोमवारपासून होणार खुले त्र्यंबकवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण.
नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचे नियम शिथिल करीत दिवाळी पाडव्याला राज्यातील सर्व देवस्थाने जनतेसाठी खुली करण्यात येतील असे जाहीर केले. नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिर कोरोना काळात दिनांक 18 मार्चपासून बंद होते. मंदिर सुरू व्हावे यासाठी गावातील जनतेने ठीक ठिकाणी खूप निवेदने दिली परंतु त्यांना फक्त आश्वासनेच मिळाली. परंतु ठाकरे सरकार यांच्या मंदिरे खुली करण्याच्या निर्णयाने त्र्यंबक वासियांची खऱ्या अर्थाने दिवाळी गोड होणार आहे. मंदिरावर पूर्ण त्र्यंबकेश्वर गावाची रोजीरोटी व आर्थिक व्यवहार चालत असल्याने मागील सहा महिन्यापासून गावाची परिस्थिती बिकट झाली होती परंतु आता पुन्हा सर्व परिस्थिती सुरळीत होणार व खऱ्या अर्थाने आता दिवाळी साजरी होणार असे गावकर्यांचे म्हणणे आहे. दररोज एक हजार भक्तांना दर्शनाची व्यवस्था त्रंबकेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे करण्यात येणार असून मास्क व सॅनिटायझेशन केल्याशिवाय मंदिरात प्रवेश मिळणार नाही व ऑनलाइन दर्शन बुकिंग चाही विचार केला जाणार आहे असे त्रंबकेश्वर देवस्थान विश्वस्त प्रशांत गायधनी यांनी जाहीर केले.
No comments:
Post a Comment