*शिधापत्रिकाधारकांना २० रुपये प्रति किलो दराने साखर उपलब्ध* पालघर(प्रतिनिधी) दि.११ : सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील शिधापत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिका १ किलो प्रमाणे २० रुपये प्रति किलो या दराने साखर १००% उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
वितरण व्यवस्थेसाठी एन.सी.डी. इ.एक्स स्पॉट एक्सचेंज लिमिटेड मार्फत अत्यंत आधुनिक व पारदर्शक पध्दतीने लाईक ऑक्शनच्या माध्यमातून त्यांचेकडील नोंदणीकृत Balran Kartamal, Akola यांच्याकडून पालघर जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमी तसेच दिपावली सणानिमित्त माहे नोव्हेंबर, २०२० साठी सार्वजनिक. वितरण व्यवस्थेअंतर्गत प्राधान्य कुटुंबातील लाभाथों शिधापत्रिकाधारक २८६७ क्विटल साखर प्राप्त होणार आहे. पालघर जिल्ह्यातील तालुकानिहाय गोदामांपर्यंत साखर पोहोचविणेसाठी संबंधितास सूचना देण्यात आल्या आहेत .
No comments:
Post a Comment