Saturday, October 3, 2020

पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भारती कामडी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिर.

पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भारती कामडी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिर.
         पालघर (रवि राठोड)आज रविवार 3 ऑक्टोबर रोजी पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भारती कामडी यांच्या वाढदिवसानिमित्त पालघर जिल्हा परिषद शाळा नंबर 1 येथे भव्य
रक्तदान शिबिर आयोजित केले होते या कार्यक्रमास पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, आमदार श्रीनिवास वनगा,जिल्हाध्यक्ष राजेश शहा,तालुका अध्यक्ष विकास मोरे,शहर अध्यक्ष भूषण संखे,नगरपरिषद पालघर गटनेते कैलास म्हात्रे,नगरसेविका अनुजा तरे, दिक्षा संखे,मोनिका गवळी, जि. प. गटनेते प्रकाश निकम,सभापती मोखाडा सारिका निकम,तसेच  श्वेता देसले व जि. प. सदस्य, पंचायत समिती सदस्य, शिक्षक सेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी,युवा सेने पदाधिकारी व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
सर्व प्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज,हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब व माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमास सुरुवात झाली. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास प्रमाणपत्र, एक गुलाबाचे फुल, आणि स्वच्छ भारत सुंदर भारत संकल्पनेनुसार कचरापेटी (dustbin) भेट देण्यात आली.

No comments:

Post a Comment