दि.२५/८/२०२०
जि.प.पालघर
*आर.टी.इ. २५% अंतर्गत लॉटरी लागलेल्या प्रवेशासाठी जि.प.उपाध्यक्ष यांचे पालकांना आवाहन*
पालघर (निलेश भोईर)आरटीई २५ % प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे त्यानुसार सोडत दि .१७ .३.२०२० रोजी काढण्यात आली असून ज्या विध्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत लॉटरी लागली आहे त्यांनी दि .३१.८.२०२० रोजी पर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निशित करावयाचा आहे .त्यानंतर लॉटरी लागलेल्या कोणत्याही बालकास प्रवेश दिला जाणार नाही याची दक्षता घ्यायी दि . ३१.८.२०२० नंतर वेटिंग लिस्ट मधील विध्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे .तसेच नोव्हेल कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव लक्षात घेता पडताळणी समितीकडे पालकांनी गर्दी करुन नये . ज्या बालकांना लॉटरी लागली आहे . त्यांच्या पालकांनी मुळ कागदपत्रे व छायांकित प्रती घेऊन ज्या शाळेत लॉटरी लागली आहे . त्या शाळेत दि .३१.०८.२०२० रोजीच्या आत जाऊन आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करावा . शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करणे शक्य नसल्यास ई - मेल द्वारे , कागदपत्रे शाळेस पाठऊन दुरध्वनी द्वारे शाळेतील मुख्याध्यापकांशी संपर्क करुन पालकांनी प्रवेश निश्चित करावा . असे आवाहन उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण समिती निलेश सांबरे यांनी केले आहे.
तसेच शाळांनी त्यांना आरटीई पोर्टलवर जी यादी प्राप्त झाली आहे . त्या यादीतील अद्याप शाळेत प्रवेशासाठी न आलेल्या बालकांच्या पालकांना दुरध्वनीद्वारे , ई - मेलद्वारे संपर्क करुन त्यांच्या प्रवेशाची कार्यवाही दि .३१.०८.२०२० पूर्वी पूर्ण करण्यात येईल अशी माहिती उपाध्यक्ष निलेश सांबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी , जि.प.पालघर व शिक्षण विभाग ( प्राथ . ) यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment