Wednesday, September 2, 2020

जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ रुजू

*जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ  रुजू*

पालघर दि.  2 : पालघरचे  जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी आज जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला असून ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाले. 

           श्री  गुरसळ  हे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असुन त्यांनी प्रशासकीय सेवेमध्ये विविध पदावर आपले कर्तव्य बजावले आहे. 

निवासी उपजिल्हाधिकारी किरण महाजन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात श्री गुरसळ यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या 
    यावेळी पालघरचे प्रांतधिकारी धनाजी तोडसकर, तहसीलदार सुनील शिंदे, उज्वला भगत आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment